लोणार (रामप्रसाद जाधव) – लोणार तालुक्यातील बीबी या गावात बालग्राम सहारा अनाथालयातील अनाथांचा बालाविष्कार सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन ग्रामस्थांच्यावतीने २६ जानेवारी रोजी सायंकाळी साडेसहा वाजता करण्यात आले आहे.
बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील डोंगराच्या कुशीत वसलेल्या बालग्राम सहारा अनाथालयाचे संचालक संतोषदादा गर्जे या ऊसतोड कामगारांच्या मुलाने बालग्राम हे अनाथालय २००४ साली सुरू केले आहे. या अनाथालयात आजरोजी १२० मुले आहेत. यांचा अन्नदानाचा एका दिवसाचा खर्च जवळपास ९ ते १० हजार रुपयाचा आहे. अतिशय बिकट परिस्थितीतून मार्ग काढत संकटाशी झुंज देऊन खरतड परिस्थितीचा सामना करत असताना ज्यांचे कोणी नाही त्यांचे आम्ही या उदात हेतूने संतोष गर्जे व त्यांची पत्नी प्रीती गर्जे हे अनाथालय चालवत आहेत. अनाथ बालकांना समाजात कशी वागणूक मिळते आणि त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्याची गरज असल्याचे बालग्राम परिवार समाजाला काही नाट्यरूपी, कलागुणातून, धार्मिक कार्यक्रमातून समजावून सांगण्याचा प्रयत्न बालग्राममधील अनाथ मुलेही काहीतरी घडवू शकतात हे दाखवून देणार आहेत.
या अनाथालयात ज्यांची समाजात जन्म घेऊन काहीही चुकी नाही अशा बालकांच्या वाट्याला आलेल्या अनाथपणात आपण त्यांचा मी समाजात जन्मलो आणि समाजाचे काही देणे लागतो या उद्देशाने आपणच त्यांचे दादा, ताई, काका, मामा-मामी बनवूया आणि त्यांचं कौतुक दिनांक २६ जानेवारी २०२३ रोजी वेळ सायंकाळी ठीक ०६: ३० वाजता वसंतराव नाईक महाविद्यालयाच्या प्रांगणात करूया. या अनाथबालकांचा डोळ्याचे पारने फेडणारा सांस्कृतिक कार्यक्रम बीबी ग्रामस्थांच्यावतीने आयोजित करण्यात आला आहे तरी जास्तीत जास्त लाखोच्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित राहून या बालकांचा आनंद द्विगणित करावा हे आवाहन बालग्राम परिवार बीबीच्या वतीने करण्यात आले आहे.