Head linesKARAJATPachhim Maharashtra

‘रुबी हॉल’चे डॉ.जगदीश हिरेमठ व सहकार्‍यांनी बेनवडीत लुटला निसर्गाचा आनंद

कर्जत (प्रतिनिधी) – हृदयरोगाने त्रस्त रुग्णासाठी देवदूत असलेले रुबी हॉल क्लिनिकचे डॉ.जगदीश हिरेमठ आज कर्जत तालुक्यातील बेनवडी येथील धुमाळ फार्मवर आपल्या कुटुंबीय व सहकार्‍यांसह आले व त्यांनी निसर्गाचा मनसोक्त आनंद घेतला. त्याच्या आगमनाने परिसरातील रुग्णांचाही आनंद गगनात मावत नव्हता.

माळरानावर झाडाला लगडलेले द्राक्षाचे घड, निसर्गरम्य वातावरण, जवळच नव्याने विकसित होत असलेले पक्षी निरीक्षण स्थळ, पाण्याने भरलेले शेततळे, थंड हवा जोडीला चवदार हुरडा, हरभर्‍याचा ढाळा यासोबत ग्रामीण भागातील आदरातिथ्य व प्रेमाने केलेले स्वागत, या सर्वाचा अनुभव कर्जत तालुक्यातील बेनवडी येथील धुमाळ फार्म हाऊसवर पुणे येथील रुबी हॉल क्लिनिकचे डॉ. जगदीश हिरेमठ यांचेसह कुटुंबीय व हॉस्पिटलचे सहकारी या सर्वांनीच घेतला. डॉ हिरेमठ निष्णात हृदयरोग तज्ञ असून त्याच्या उपचाराने अनेकांचे ऑपरेशन टळले आहेत. रुग्णांना अत्यंत आपुलकीने उपचार करणारे डॉक्टर कोणाचीही पैशामुळे अडवणूक करत नाही तर अडचणी असलेल्य्ींना विशेष मदतच करतात त्यामुळे त्याच्या संपर्कात येणार्‍या रुग्णांना ते देवदूतच वाटतात.

बेनवडी येथील मच्छिंद्र गायकवाड यांचे हृदरुग्णांना गरजेच्या वेळी पुणे येथील रुबी हॉल क्लिनिक मध्ये हृदयरोग तज्ञ डॉ. जगदीश हिरेमठ यांनी अत्यंत चांगले उपचार केले व रुग्णाचा जीव वाचवला यामधून गायकवाड यांनी आपल्या परिसरातील अनेक रुग्णांवर हिरेमठ यांचेकडून उपचार करून घेतले व बघता बघता गेली अनेक वर्षापासून गायकवाड व हिरेमठ यांच्या ऋणानुबंध तयार झाले. अँजिओग्राफी व अंजू प्लास्टिकचे तज्ञ असलेले सुप्रसिद्ध डॉक्टर हिरेमठ यांना आपल्या गावी येण्याची अनेकदा गायकवाड यांनी विनंती केली व हा योग काल जुळवून आला. बेनवडीचे सरपंच पोपटराव धुमाळ यांच्या द्राक्ष बागेजवळ त्याच्यासह सहकार्याचे फेटा बांधून व गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. त्याचेसाठी हुरडा पार्टीचे आयोजन करण्यात आले, यानंतर या सर्वांनी द्राक्ष बागेत फिरत मनसोक्त सेल्फीसह फोटो काढण्याचा आनंद घेतला. तर शेतात फिरताना चौकसपणे विविध बाबीची माहिती ही घेतली.

छोट्यांच्या ट्रॅक्टरवर बसून फोटो काढण्याचा अनेक सहकारी आनंद घेत असताना डॉ. हिरेमठ यांना ही ट्रॅक्टरवर बसण्याचा मोह आवरला नाही. बागेत द्राक्षाचे घड लटकत असताना त्याखाली कसे बसे वाकून ट्रॅक्टरवर बसत तो चालवण्याचा ही आनंद घेतला. तर शेततळ्याजवळ जाऊन सर्वाबरोबर फोटोही काढले. डॉ. हिरेमठयांचे बरोबर रुबी हॉल क्लिनिकचे संगीता पोरवाल, शीतल तडके, रोहिणी कांबळे, अरुणा चौधरी, श्रीदेवी तरंगे, आगतराव तरंगे, स्मीता देशनेहरे, सारिका पिल्ले, मोहिनी जाधव, महादेवी कोरे, कविता भिंगारदिवे, अमुथा पिल्ले, मधुकर कांबळे, भारती शेलार आदीनी मनोसोक्त आनंद लुटला. यावेळी राशीन येथील डॉ. राजकुमार आंधळकर, डॉ. कीर्ती आंधळकर यांचेसह बेनवडी ग्रामपंचायतचे सरपंच पोपटराव धुमाळ, ग्रामपंचायत सदस्य मच्छिंद्र गायकवाड, सचिन खुडे, औदुंबर भोसले, सोमनाथ डमरे, महादेव गदादे, पै. राजेंद्र भिताडे, अरुण गायकवाड, संपत धुमाळ, औदुंबर गदादे, नवनाथ काळे, हनुमंत दवणे, रामदास धुमाळ, बापू गदादे, भाऊ दादा गदादे, धुळाजी गायकवाड यांचेसह अनेक नागरिक उपस्थित होते. यावेळी डॉ. हिरेमठ यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना मोकळ्या हवेचे महत्व विशद करताना माणसाच्या लाईफ स्टाईलबाबत मोलाचा सल्ला दिला, तर डॉ. राजकुमार आंधळकर यांनी डॉक्टर हिरेमठ यांचा सर्वांना परिचय करून दिला. यावेळी उपस्थित अनेक रुग्णांनी आपले अनुभव व्यक्त केले, तर सरपंच धुमाळ यांनी सर्वांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!