Breaking newsHead linesMaharashtraPachhim Maharashtra

शासकीय महापुजेला कोण येणार?

– उद्धव ठाकरेच सपत्नीक करणार महापूजा!
सोलापूर (जिल्हा प्रतिनिधी) – राज्यात शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळते की काय, असे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे १० जुलैरोजी येत असलेल्या आषाढी एकादशीला पंढरपुरात श्री हरी विठ्ठल व रुख्मिणी मातेची शासकीय महापुजा कोण करणार, असा प्रश्न निर्माण झाला असून, त्याबाबत वारकरी बांधवांत चर्चा रंगते आहे. परंतु, काही झाले तरी विठूमाऊली उद्धव ठाकरेंवरील राजकीय संकट दूर करेल, व त्यांच्याहस्तेच शासकीय महापूजा होईल, अशी माहिती ज्येष्ठ वारकरी देत आहेत.
संतांच्या पालख्या पंढरपूरकडे निघालेल्या आहेत. पावसानेदेखील उघडीप दिली असून, आषाढीची यात्रा होईपर्यंत पाऊस येणार नाही, अशी चर्चा वारकरी बांधवांत रंगते आहे. त्यातच राज्यातील राजकीय अस्थिरतेबाबतही चर्चा होत आहे. ठाकरे सरकार धोक्यात असल्यामुळे विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सपत्नीक शासकीय महापुजेला येणार की देवेंद्र फडणवीस हे महापुजेला येणार, याबाबत वारकरी बांधवांतही चर्चा रंगत आहे. जाणकार आणि ज्येष्ठांच्या माहितीनुसार, ठाकरे यांच्यावरील संकट हे विठूमाऊली दूर करेल व त्यांनाच शासकीय महापुजेला बोलावेल, असे सांगितल्या गेले. संतांच्या पालख्या मार्गस्थ असताना, कोणत्याही राज्यावर कधी संकट आलेले नाही. हा इतिहास पाहाता, आताही ते येणार नाही, असे वारकरी बांधवांनी सांगितले.
——————-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!