लोणार (रामप्रसाद जाधव) – स्नेहसंमेलनात आपण महापुरुषांचे वेश धारण करून त्यांच्या आठवणीला उजाळा देतो, त्याप्रमाणे प्रत्यक्षात त्यांच्या विचारांचा सुद्धा अंगीकार करण्याची आवश्यकता आहे, असे आवाहन अॅड. शर्वरीताई तुपकर यांनी वसंतराव नाईक सेमी इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज येथे स्नेहसंमेलनाचे अध्यक्षीय भाषणातून केले.
येथील वसंतराव नाईक सेमी इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे नुकतेच वार्षिक स्नेहसंमेल संपन्न झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अॅड. शर्वरीताई रविकांत तुपकर ह्या होत्या. तर प्रमुख अतिथी म्हणून सरपंच शारदाबाई महाजन, बीबी पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक सदानंद सोनकांबळे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सहदेव लाड, केंद्रप्रमुख सुनील बोरकर हे उपस्थित होते. सर्वप्रथम मान्यवरांच्याहस्ते स्नेहसंमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी शाळेच्यावतीने सर्व प्रमुख अतिथींचे व परिसरातील पत्रकारांचा सत्कार करण्यात आला.
द्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. अध्यक्षीय भाषणात शर्वरीताई तुपकर यांनी महापुरुषांच्या कार्याविषयी माहिती विषद करून, प्रबोधन केले. ज्याप्रमाणे आपण स्नेहसंमेलनप्रसंगी विविध महापुरुषांचे वेश धारण करून कार्यक्रम सादर करतो, त्याचप्रमाणे आयुष्यातसुद्धा त्यांचे विचार आत्मसात करण्याची गरज निर्माण झाली आहे, असे त्या म्हणाल्यात. या कार्यक्रमात बहुसंख्य पालकवर्ग उपस्थित होता. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस. ढाकणे यांनी केले तर आभार मुख्याध्यापक गजानन आडे यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता मुख्याध्यापक शिक्षक व इतर कर्मचार्यांनी अथक परिश्रम घेतले.