BULDHANAChikhaliVidharbha

निकृष्टदर्जाचे अ‍ॅण्ड्रॉईड मोबाईल अंगणवाडी सेविकांसाठी बनले डोकेदुखी!

चिखली (एकनाथ माळेकर) – अंगणवाडी सेविकांना राज्य सरकारने दिलेले मोबाईल निकृष्टदर्जाचे असून, त्यांमुळे या अंगणवाडी सेविकांना काम करणे तर कठीणच झाले. परंतु, प्रचंड मानसिक व आर्थिक त्रासदेखील होत आहे. राज्य सरकारच्या या निषेधार्थ चिखली तालुक्यातील अंत्री खेडेकर भाग एक, भाग दोनच्या पंचवीस अंगणवाडी सेविकांनी आपले मोबाईल अंगणवाडी-बालवाडी कर्मचारी युनियन (आयटक) संघटनेकडे जमा करून दिले आहेत. संघटनेच्यावतीने हे मोबाईल राज्य सरकारला परत केले जाणार आहेत.

अंगणवाडी, बालवाडी कर्मचारी युनियन (आयटकच्या) राष्ट्रीय कमिटी सदस्या तथा बुलढाणा जिल्हा सचिव एस. एस. तळेकर मॅडम यांच्या नेतृत्वाखाली चिखली तालुक्यातील अंत्री खेडेकर भाग एक, भाग दोनच्या पंचवीस अंगणवाडी सेविकांनी आपापले शासकीय अ‍ॅण्ड्रॉईड मोबाईल तळेकर मॅडम यांच्याकडे जमा करून दिले. अंगणवाडी, बालवाडी कर्मचारी युनियन हे मोबाईल शासनाकडे परत करणार आहेत. दिलेले मोबाईल अत्यंत हलक्या दर्जाचे असून, त्यामध्ये अ‍ॅप डाऊनलोड होत नाही, आणि कधीकधी डाऊनलोड झाल्यावर भरलेली माहिती अपलोड होत नाही. त्यामुळे अंगणवाडी सेविकांची शासकीय माहिती व कार्यालयीन अहवाल शासनाला वेळेवर पोहोचू शकत नाहीत. २०१९ मध्ये अंगणवाडी सेविका यांना शासनामार्फत हे मोबाईल देण्यात आले होते. २०२३ नुकतेच सुरू झाले, याअगोदर पासून मोबाईलची बॅटरी डाऊन होणे, डिस्प्ले जाणे, बॅटरी लवकर उतरणे, रिचार्ज भत्ता कमी प्रमाणात मिळणे, अशा प्रकारच्या अडचणी आहेत. आज रोजी मोबाईल निकृष्ट दर्जाचे आहेत. त्यासाठी नवीन मोबाईल शासनाने उपलब्ध करून द्यावे, जेणेकरून शासकीय ऑनलाईन कामे सुलभ होतील. शासनाला वेळेवर अचूक माहिती पाठविणे शक्य होईल व अंगणवाडी सेविकेचा त्रास कमी होईल. यासाठी सर्व अंगणवाडी सेविकांनी सिटु कर्मचारी युनियन आयटकच्या राष्ट्रीय कमिटी सदस्या व बुलढाणा जिल्हा सचिव एस. एस. तळेकर मॅडम यांनी मोबाईल जमा करून शासनाला परत करणार आहे. अनेक वेळा शासनाच्या निदर्शनास सदर बाब आणून दिल्यानंतरही शासनाने आजपर्यंत कुठल्याही प्रकारच्या उपाययोजना न केल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला असे त्यांनी ब्रेकिंग महाराष्ट्रला सांगितले. सदर कार्यक्रमांमध्ये अंत्री खेडेकर भाग एक, भाग दोनच्या सर्व २५ अंगणवाडी सेविका व आयटकच्या बुलढाणा सचिव तळेकर यांनी या प्रक्रियेत भाग घेतला.
—————-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!