Head linesKARAJATPachhim Maharashtra

श्री गोदड महाराजांचा चमत्कार सहा महिन्यात दिसला : आ. प्रा. राम शिंदे

कर्जत (प्रतिनिधी):- काही दिवसापूर्वीच आपण ग्रामदैवत संत श्री गोदड महाराजांसमोर दारात बसलो होतो. वाटले नव्हते महाराज लगेच चमत्कार दाखवतील, पण सहा महिन्यात आमदार झालो, सरकार पण आले व आता तर प्रवीणदादा सोबत असल्याने २०२४ मध्ये तुमच्या मनात जे आहे ते घडणार आहे, असे वक्तव्य आ. प्रा. राम शिंदे यांनी केले. राजमाता जिजाऊ ग्राम विकास प्रतिष्ठान व प्रवीणदादा घुले मित्रमंडळ आयोजित फु बाई फु कॉमेडी कार्यक्रमात बोलत होते.

कर्जत येथे आ. प्रा. राम शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त नुकतीच राजकीय सोयरिक झालेले काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण घुलेचे समर्थक व राजमाता जिजाऊ ग्राम विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेश जगताप व प्रवीण घुले मित्रमंडळ यांच्यावतीने फु बाई फु कॉमेडी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कर्जतकरांसाठी हास्यांची मेजवानी सादर करताना, चित्रपटातील गाणी आणि लावणी, ग्रुप डान्स सादर करण्यात आला. यामध्ये टीव्हीवरील प्रसिद्ध कलाकार सागर कारंडे, कमलाकर सातपुते, आशीष पवार, किशोरी आंबिये, माधवी जुवेकर, भार्गवी चिरमुले, संदीप गायकवाड, प्रणव रावराणे, डांसक्वीन वैष्णवी पाटील यांनी प्रेक्षकांची वाहवा मिळवली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला पै प्रवीण घुले यांचे कार्यक्रम स्थळी आगमन होताच जनसमुदायाने जल्लोष करत कार्यक्रमात उत्साह निर्माण केली. काही वेळात आ. राम शिंदेचे आगमन होताना पुन्हा तोच उत्साह ओसंडून वाहत होता.

मंचावर आ. राम शिंदे यांचे औक्षण माजी जि. प. सदस्या मोहिनीताई घुले व शीतल महेश तनपुरे यांनी केले, तर महेश तनपुरे, आंबीजळगावचे सरपंच विलास निकत, विजय मोरे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महेंद्र धांडे, दादा सूरवसे, अमोल भगत यांनी गुलाबाचा हार घालत सत्कार करून गणेशाची सुंदर मूर्ती भेट दिली. यावेळी भव्य केक कापण्यात आला. याप्रसंगी आकर्षक फटाक्याची आतषबाजी नेत्रदीपक होती. यावेळी प्रवीण घुले यांनी बोलताना आ. राम शिंदेचा उल्लेख विकासपुरुष असा करताना आगामी उज्ज्वल यशासाठी शुभेच्छा देताना आ. राम शिंदे हे तुमच्या साठी जो संघर्ष करत आहात त्यामध्ये तुमची अशीच साथ मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. तर आ. राम शिंदे यांनी बोलताना यंदा आपल्या वाढदिवसाचा सप्ताह बसला असून, त्याचे ऋण आपण कदापि विसरणार नाही. कर्जत-जामखेड मतदारसंघाचे प्रेम अवर्णनीय आहे. आता त्या प्रेमात आणखी भर पडणार आहे. मागच्या वर्षी याच वेळी आपण संत सदगुरु गोदड महाराजांच्या दारात न्याय मिळावा यासाठी बसलो होतो. महाराजांनी सहा महिन्यात चमत्कार दाखवला, आपण आमदार झालो याच वेळी सरकार पण आले. महाराज इतक्या लवकर चमत्कार दाखवतील असेल वाटले नव्हते. या पुण्यभूमीत नीती आणि नियतीचा खेळ चालतो. त्यामुळे महाराजांच्या आशीर्वादाने आणि तुमच्या प्रेमाने जोमाने काम करत असून, आगामी २०२४ साली तुमच्या मनात जे आहे ते घडणार आहे असे म्हटले.

या कार्यक्रमास तानाजी पाटील, अमोल भगत, श्रीराम गायकवाड, भाजपाचे सचिन पोटरे, बापू शेळके, काका धांडे, आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सरपंच अनिल खराडे, रणजीत अडसूळ, प्रदीप पाटील, दादासाहेब रोकडे, राजू बागवान, तात्यासाहेब कचरे, प्रियेश सरोदे, गणेश वाळुंजकर, विश्वास शिंदे आदींनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमास महिला सह युवकांचा सहभाग लक्षणीय होता.
—————-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!