KARAJATMaharashtraPachhim Maharashtra

शेतकर्‍यांना वीजबील भरण्यास मुदत द्यावी; महावितरणने वीज जोडणी तोडू नये : राष्ट्रवादी काँग्रेस

कर्जत (प्रतिनिधी) – अतिवृष्टीने सर्वसामान्य शेतकरी अडचणीत असून, वीज वितरण कंपनीने वीज बिलासाठी कोणत्याही शेतकर्‍याची वीज जोडणी तोडू नये, बील भरण्यास शेतकर्‍यांना मुदत द्यावी. शेतकर्‍यांची वीज तोडल्यास राष्ट्रवादी काँग्रेसला नाईलाजास्तव आंदोलन करण्याचा मार्ग अवलंब करावा लागेल, असा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने महावितरण विभागास देण्यात आला.

कर्जत तालुक्यात महावितरण विभागाने शेतकर्‍यांना वीज बिले वेळेत न भरल्यास वीज तोडणी करण्याचा इशारा दिला आहे. वास्तविक पाहता अतिवृष्टीमुळे शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान झाले आहे. या कारणाने शेतकर्‍यांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली असून अशातच महावितरणने शेतकर्‍यांची वीज तोडणी मोहीम राबविली तर शेतकर्‍यांसमोर आत्महत्या करण्याशिवाय पर्याय राहणार नाही. वीज बील भरण्यासाठी शेतकर्‍यांना वाढीव मुदत मिळावी. जर तालुक्यात शेतकर्‍यांची वीज तोडण्यात आल्याचे निदर्शनास आले, तर या जुलमी निर्णयाविरुद्ध आणि शेतकरी हितासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेस वेळप्रसंगी रस्त्यावर उतरेल, असा इशारा तालुका प्रशासनास दिला आहे.

या आशयाचे निवेदन तहसीलदार नानासाहेब आगळे, महावितरणचे अभियंता कैलास जमदाडे यांना देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष नितीन धांडे, पंचायत समितीचे उपसभापती राजेंद्र गुंड, जि. प. सदस्य गुलाब तनपुरे, शामभाऊ कानगुडे, सुनील शेलार, शहराध्यक्ष प्रा. विशाल मेहेत्रे, पाणीपुरवठा सभापती भास्कर भैलुमे, नगरसेवक भाऊसाहेब तोरडमल, अभय बोरा, रज्जाक झारेकरी, रवी सुपेकर, सोशल मीडियाचे दीपक यादव, रणजीत घनवट, दिलीप जाधव, संग्राम पाटील, हेमंत मोरे, विजय देवकाते आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!