– पाकिस्तान हादरले, हल्लेखोर पोलिसांच्या ताब्यात
इस्लामाबाद – पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आज प्राणघातक हल्ल्यातून थोडक्यात बचावले आहेत. त्यांच्यावर हल्लेखोराने एके-४७ रायफलमधून जवळून गोळीबार केला. परंतु, सुदैवाने कंटेनरमध्ये व त्यातही गर्दीत असलेल्या इम्रान खान यांच्या पायात गोळी लागली. त्यांच्यासह चार खासदार गंभीर जखमी झाले असून, हल्लेखोर पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. पंजाब प्रांतातील वजीराबाद येथे आयोजित लाँग मार्चमध्ये हा प्रकार घडला. या घटनेने पाकिस्तान हादरले आहे.
Imran Khan was shot in the leg but was stable while being taken to hospital. He waived at supporters too. #عمران_خان_ہماری_ریڈ_لائن_ہے pic.twitter.com/XizoAQzPax
— PTI (@PTIofficial) November 3, 2022
माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या राजीनाम्याच्या मागणीसह पाकिस्तानात तातडीने निवडणुका घेण्यासाठी लाँग मार्च सुरु केला आहे. त्यांचा लाँग मार्च पंजाब प्रांतातील वजीराबाद येथे आला असता, ते कंटेनरमधून उतरून जनसभेला संबोधित करण्यासाठी जात असताना अचानक एका एके-४७ रायफलधारी व्यक्तीने त्यांच्या दिशेने गोळीबार केला. त्यात चार खासदारांसह अनेकजण गंभीर जखमी झालेत. तर इम्रान खान खाली वाकल्याने त्यांच्या पायाला गोळी लागून ते जखमी झालेत. पोलिसांनी तातडीने हल्लेखोरास ताब्यात घेतले तसेच इम्रान खान यांना रुग्णालयात नेण्यात आले. या घटनेने पाकिस्तानमध्ये खळबळ उडाली असून, माजी पंतप्रधान बेनझीर भुत्तो यांच्या हत्येची आठवण ताजी झाली होती. पंतप्रधानांसह सर्वपक्षीय नेत्यांनी या घटनेचा निषेध केला आहे.———–