BULDHANAChikhali

सवणा ग्रामपंचायतीने गैरकायदेशीररित्या दिली विकासकामाला स्थगिती

– तातडीने स्थगिती उठवून विकासकाम करण्याची मागणी

चिखली (महेंद्र हिवाळे) – सवणा ग्रामपंचायतीने राज्यघटनेच्या भेदभाव वर्तन न करण्याच्या कलमांचेच उल्लंघन करत, १५ व्या वित्त आयोगामार्फत प्राप्त निधीतून मुस्लीम समाजाच्या ग्रामपंचायत सदस्यांच्या वार्डात करायवाच्या कामांना गैरकायदेशीररित्या स्थगिती दिली आहे. याबाबत या अन्यायग्रस्त सदस्याने थेट बुलढाणा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) यांच्याकडे धाव घेत, तक्रार दाखल केली असून, ग्रामपंचायतीची स्थगिती उठवून, वार्डात विकासकाम करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

या तक्रारअर्जात नमूद आहे, की ग्रामपंचायत सवणाचे निर्वाचित सदस्य यांनी लोकनियुक्त प्रतिनिधी कय्युम शाह वार्ड नं. ३ करिता १५ व्या वित्त आयोगामार्फत जनरल वस्तीत अमामुल्ला खान ते शेख रऊफ कोतवाल, शे. इरफान शे. नसिम ते कादर शाह यांचे घराकडे जाणारा रस्ता, कादर शाह ते नसिर कोतवाल यांचे घराकडे जाणारा रस्ता, दिनकर सोलाट ते अशोक शेळके यांचे घराकडे जाणारा रस्ता, तेजराव चोपडे ते तोताराम गाढवे यांचे घराकडे जाणारा रस्ता यासाठी असलेली तरतूद सहा लाख रुपये अशी विकास कामे दिनांक २७ मे २०२२ रोजी मासिक सर्वसाधारण सभा ठराव क्रमांक ७ नुसार सर्वसंमतीने मंजूर करून घेतलेली आहेत. सदर कामाची रितसर ई- निविदा काढण्यात आली व सदर कामाचे कंत्राट हे कंत्राटदार गोपाल शालीकराम डुकरे रा. देऊळगांव धनगर ता. चिखली जि. बुलडाणा यांना ग्रामपंचायत कार्यालय, सवणा दिनांक १३/०४/२०२२ चे वर्क ऑर्डर नुसार देण्यात आले. सदर वर्क ऑर्डर वरून संबंधित कंत्राटदाराने काम सुरू करण्यापूर्वीच वार्डातील विकास कामांना स्थगिती देण्यात आली. तसेच ग्रामपंचायत सवणाचा सर्वात लहान वयाचा व अल्पसंख्याक समाजाचा एकमेव सदस्य असून, इतर सदस्यांनी संगनमताने माझ्या वार्ड नं. ३ मध्ये विकास होऊ नये म्हणून व नागरिकांची गैरसोय व्हावी, त्यांना मुलभूत सुविधा मिळू नये याकरिता जाणून बुजून राजकिय व्देषापोटी व माझी सामाजिक, राजकिय वजन व प्रतिमा मलिन करण्याच्या हेतुने सदरचे कृत्य केले आहे. तरी सदर प्रकरणाची आपले स्तरावरून चौकशी करून योग्य ती कार्यवाही करावी. वार्डातील स्थगित करण्यात आलेली विकास कामे त्वरित सुरू करण्याबाबत ग्राम पंचायत सवणाचे पदाधिकारी व ग्रामसेवक यांना निर्देशित करण्यात यावे, अशी मागणी या तक्रारअर्जाद्वारे करण्यात आलेली आहे.
————–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!