नवरात्रोत्सवाच्या सातव्या दिवशी हजारोच्या संख्येतून सर्वसामान्य भाविकाला मिळाला महापूजेचा मान
आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : हिंदू धर्मात नवरात्रीला खूप महत्त्व आहे. नवरात्रीमध्ये देवीचे नऊ रूपांची पूजा केली जाते. शारदीय नवरात्रोत्सवाच्या सातव्या दिवशी देवीचे सातवे रूप कालरात्रीची पूजा केली जाते. २ ऑक्टोबर २०२२, रविवारी, देवी दुर्गेच्या सातव्या रूपाची विधिवत पूजा केली जाते. देवी कालरात्रीचे शरीर अंधारासारखे काळे आहे. आईचे केस लांब आणि विखुरलेले आहेत. आईच्या गळ्यात माळ आहे, जी विजेसारखी चमकत राहते. देवी कालरात्रीला चार हात आहेत. आईच्या हातात खड्ग, शस्त्र, वरमुद्रा आणि अभय मुद्रा आहे.
आद्य स्वयंभू शक्तीपीठ श्री क्षेत्र सप्तशृंगगड येथे नवरात्रोत्सवाच्या सातव्या दिवशी हजारो भाविकांनी भक्तिमय वातावरणात देवीचे दर्शन घेतले. यावेळी ऍड श्री दिपक पाटोदकर यांनी स्वतःची मानाची श्री सप्तशृंग देवीची महापूजा सर्वसामान्य भाविकाला देण्याचा पूर्वनिर्धार करून मंदिरात असलेल्या गर्दीतून अहमदनगर जिल्ह्यातील भाविक श्री. प्रकाश लक्ष्मण झोलेकर व सौ. सखुबाई झोलेकर मु. पो. धुमालवाडी, ता. अकोले यांना संधी दिली. स्वतःच्या मानाची पंचामृत महापूजा सर्वसामान्य भाविकाला देण्याचा विश्वत ऍड श्री दिपक पाटोदकर केलेला प्रयत्न हा भाविक वर्गात नवा हर्ष निर्माण करून गेला. महापूजेचे दुसरे मानकरी धर्मादाय सह आयुक्त श्री तुफानसिंग अकाली यांनी महापूजा व आरती प्रसंगी झोळेकर, पाटोदकर व अकाली कुटुंबीयांनी उपस्थित राहून श्री भगवतीचे दर्शन घेतले. सकाळी सप्तशृंगी देवीला नवीन सुवर्ण अलंकारांनी सजविण्यात आले. गडावरील पुरोहितांच्या मंत्रघोषात सकाळी ७ वाजता देवीची महापूजा करण्यात आली. यावेळी देवीचे रूप अधिकच खुलून दिसत होतं आणि किमान ७० हजार व त्यापेक्षा अधिक संख्येने भाविकांनी श्री भगवतीचे दर्शन तर किमान १५ हजार भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
विशेष बाब:
राजकीय व सामाजिक जीवनातात सेवाभावी वृत्तीची कल्पना करतांना व प्रत्यक्ष त्या प्रक्रियेत कार्यरत होवून स्वतःची कार्यातून अथवा पदामुळे ओळख निर्मिती होण्याच्या प्रक्रियेत अनेक सकारात्मक व नकारात्मक व्यक्तित्वाची ओळख समाजाला नकळत होत असते. अर्थात एखादी व्यक्ती राजकीय व सामाजिक जीवनात स्वतःची ओळख निर्मितीच्या शोधात असलेली संधी दरम्यान व्यक्तीची भूमिका व वर्तन तसेच त्या संधीचा उपलब्धते नंतर त्या व्यक्तीच्या वर्तनात होणारा संभाव्य बदल समाज नकळत शोधतो आणि त्यातून त्या व्यक्तीचे खरी ओळख सर्वसामान्यतः निर्माण होते. खरं तर कोणत्याही संधीचं स्वतःसाठी सोनं करणारे माणसं खूप असतात मात्र तत्व आणि विचारांच्या जोडीनं कर्तव्यदक्ष राहून समाजभिमुक किंवा उद्देशानुरूप कार्य करण्याची हमी देणारे माणसं कमी असतात. त्या कमीतील संख्येचा शोध सुरू असतांना एखादा समाजभिमुक व कर्तव्यदक्ष व्यक्ती मिळावं आणि त्याबद्दल काही तरी बोलावं किंवा लिहावं असं वाटलं तर एक नावं नक्की समोर येते ते म्हणजे ऍड. श्री. दिपक राजाराम पाटोदकर (विश्वस्त श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्ट, सप्तशृंगगड) मूलतः नाशिक येथे व्यवसायाने वकील असलेले श्री दिपक पाटोदकर वर्ष २०२० साली श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्ट, सप्तशृंगगड येथे विश्वस्त पदावर निवडले गेले आणि तेथून त्यांचा सामाजिक आणि भाविक केंद्रित एक नवीन प्रवास सुरू झाला.
विश्वस्त पदाच्या सर्व सुविधा घेतांना त्याला निशुल्क ऐवजी स्वइच्छेने सशुल्क प्रकारच्या उपभोगून, विश्वस्त संस्थेचा अनावश्यक खर्च आणि वैयक्तिक फायदा टाळत देखील भाविकांच्या सेवा सुविधेत योगदान देता येते याचा आदर्श त्यांनी मागील २ वर्षात दाखवून दिला. बहुतेक खूप लोक अशी संधी मिळाली की, लोक त्या पद आणि पदाच्या संधीचा पुरेपूर फायदा घेतात आणि पदावरून गेल्यानंतर देखील तसे मिळावे अशी महत्त्वाकांक्षा ठेवतात. मात्र हे रसायन जरासं वेगळं आहे. “मी सेवा म्हणून अर्ज करून मुलाखतीच्या माध्यमातून इथे आलोय, मला भगवती आणि भाविकांची सेवा करण्याची संधी मिळाली तेच खूप आहे. मी इथल्या भाविकांनी दान धर्मातून उभारलेल्या सेवा सुविधा मोफत घ्याव्या अशी माझी परिस्थिती नाही म्हणून मी गरजवंत भाविकांला अपेक्षित असलेल्या सुविधेत वाटेकरी होत नाही.” असे म्हणून स्वतःला कमळाच्या पणासारखे टिकवणे हल्लीच्या प्रलोभनिय जगात तसे अवघड आहे. मात्र असे घडू शकते याचा आदर्श ऍड पाटोदकर यांच्या माध्यमातून समोर आल्या शिवाय राहत नाही.
अगदी ताज उदाहरण आहे, ट्रस्टच्या माध्यमातून दि. ०२/१०/२०२२ रोजीची मानाची श्री भगवती पंचामृत महापूजा विश्वस्त ऍड श्री दिपक पाटोदकर यांना मिळाली आणि त्यांनी पूजेसाठी वेळेत प्रत्यक्ष उपस्थित राहून ती पूजा स्वतः करण्या ऐवजी अतिशय मनमोकळ्या भावनेतून गर्दीतून सर्वसामान्य भाविकांच्या जोडीला बोलावून त्यांना स्वतःच्या मानाची महापूजा देवू केली आणि स्वतः सर्वसामान्य भाविकांच्या प्रमाणे देवीचे दर्शन घेतले. प्रत्यक्ष पाहणाऱ्या भाविकांना हा अनिभव नवा होता. आज पर्यंत मानाची पूजा म्हणून पूजेला येणारे विश्वस्त मंडळ प्रतिनिधी आणि त्यांच्या नातेवाईकांनी केलेली पूजा, गर्दीत फोटोसाठी थांबलेले भाविक, संख्येपेक्षा अधिक संख्येने गाभाऱ्यात जाणारे विश्वास्थांचे नातेवाईक हे सगळं पाहून पाहून थकलेल्या डोळ्यांना हा अनुभव भाविक व ग्रामस्थांना अलगद झालेला बदल आणि समाधान देणारा होता. त्या बाबत आणखी खोलात गेलं की, लोकांच्या बोलण्यातून लक्षात आलं या विश्वस्तांनी विश्वस्त झाल्या पासून स्वतःचं भोजन, निवास, प्रवास आणि सत्कार संबंधित सर्व खर्च स्वतः केलाय आणि इतरांना पेक्षा स्वतःच आगळेवेगळे पण जपले. असा आदर्श इतरांनी घेतला तर विश्वस्त शब्दाची ग्लानी नक्कीच संपेल आणि भाविकांच्या दानातून उभारलेल्या सेवा-सुविधा शेवटच्या भाविकांपर्यंत बिना गळती शिवाय व पारदर्शीपणे पोहचतील हीच माफक अपेक्षा.
सगळ्यात जास्त संख्येने सर्वसामान्य भाविक सप्तशृंग गडावर दर्शनासाठी पायी येतात. दर्शनासाठी येणाऱ्या त्यांच्या हस्ते कधी महापूजा होईल ? ऊन, पावसात, भाविकांमधून एका गरीब जोडप्याला प्रातिनिधिक स्वरूपात महापूजा देऊन सर्व भाविकांच्या आनंदात सहभागी होणार आहे.
-ॲड. दीपक पाटोदकर, विश्वस्त, श्रीसप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्ट,सप्तशृंग गड