BULDHANAChikhali

वनविभागाने चोवीसतासाच्याआत पकडले विद्यार्थ्यावर हल्ला करणारे माकड!

चिखली (एकनाथ माळेकर) – तालुक्यातील अंत्री खेडेकर येथे सर्वज्ञ प्रवीण खेडेकर या इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यावर प्राणघातक हल्ला करून त्याला जखमी करणारे माकड अखेर वनविभागाच्या अधिकार्‍यांनी पकडले आहे. अंचरवाडी सर्कलचे वनअधिकारी पठाण व त्यांच्या टीमने ही कारवाई केली. विद्यार्थ्यावरील हल्ल्याची बातमी ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ने प्रसारित केली होती. त्याची दखल घेऊन ही कार्यवाही करण्यात आली आहे.

अंत्री खेडेकर येथे काल (दि.२२) मराठी प्राथमिक शाळेत शिकणारा विद्यार्थी सर्वज्ञ प्रवीण खेडेकर याच्यावर माकडाने अचानक हल्ला करून त्याला जखमी केले होते. या घटनेने गावात प्रचंड दहशत निर्माण झाली होती. तसेच, केवळ शिक्षकांच्या समयसुचकतेने सर्वज्ञ हा माकडाच्या हल्ल्यातून वाचू शकला होता. त्यामुळे गावकरी, विद्यार्थी, शिक्षकदेखील भयभीत झाले होते. याबाबतचे सविस्तर वृत्त ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ने प्रसारित करताच, त्याची दखल वनविभागाने घेतली. अंचरवाडी सर्कलचे वनअधिकारी पठाण यांनी बुलढाणा येथून रेस्क्यू टीम बोलावली. त्यानुसार, वनपरिक्षेत्र अधिकारी अभिजीत ठाकरे, संदीप मडावी, पवन वाघ, सागर भोसले यांचे पथक अंत्री खेडेकर येथे दाखल झाले.

या पथकाने विद्यार्थ्यावर हल्ला करणारे माकड चोवीस तासांच्याआत पकडले. याप्रसंगी गावातील वसंतराव तुळशीराम खेडेकर, प्रल्हाद पाटील खेडेकर, गजानन रामराव माळेकर, भगवानराव चेके, शिक्षक इंद्रजीत खेडेकर, योगेश खेडेकर, गजानन संतोष मळेकर, आरिफ सर कॉन्व्हेंट शिक्षक, राम सदाशिव माळेकर, सतीश मदन खेडेकर, विठ्ठल माळेकर यांनी याप्रसंगी या रेस्क्यू टीमला सहकार्य केले. या पथकाने सर्वज्ञ खेडेकर या विद्यार्थ्याच्या घरी जावून त्याच्या तब्येतीचीदेखील चौकशी केली.या कामगिरीमुळे अंत्री खेडेकर शाळा समिती व शिक्षकवृंद यांच्याकडून वनविभागाचे आभार व्यक्त करण्यात आले आहेत. पकडलेल्या या माकडाला बेशुद्ध करून पकडावे लागले, त्यानंतर ते शुद्धीत आल्यानंतर त्याला जंगलात सोडून देण्यात आले आहे.
——————

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!