अभिनेत्री साईपल्लवीने काश्मिरी नरसंहाराची तुलना केली मॉब लिंचिंगशी!
मुंबई (प्रतिनिधी) – दक्षिणेतील सुप्रसिद्ध अभिनेत्री साईपल्लवी हिने एका मुलाखतीत काश्मीरमधील ब्राम्हण पंडितांच्या नरसंहाराची तुलना गायींची तस्करी करणार्यांच्या जमावाने केलेल्या हत्यांशी (मॉब लिंचिंग) केली आहे. िंहसा कोणतीही असो, ती चुकीचीच आहे, असेही ती म्हणाली. तिच्या या वक्तव्यावरून कथित हिंदुत्ववादी चांगलेच भडकले आहेत.
साईपल्लवी ही सद्या तिचा आगामी चित्रपट पर्वमच्या प्रमोशनसाठी देशभर फिरत आहे. यादरम्यान, एका मुलाखतीत तिने काश्मिरी ब्राम्हणांच्या हत्याकांडाबाबत वक्तव्य केले. काश्मीरमधील नरसंहार आणि गायतस्करांच्या जमावाने केलेल्या हत्या सारख्याच असल्याचे ती म्हणाली. तिच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर तिला मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जात असल्याचे दिसून आले.
काश्मीर फाईल्समध्ये ९०च्या दशकातील काश्मिरी पंडितांचा नरसंहार दाखवलेला आहे. जर या घटनेला आपण धर्माची लढाई म्हणून पाहात असू तर, त्या घटनेला काय म्हणावे, ज्यात गायींनी भरलेला ट्रक घेऊन जाणार्या मुस्लीम ड्रायव्हरला जय श्रीरामचे नारे देत जमावाने ठार मारले. माझ्यादृष्टीने या दोन्ही घटनांत काही फरक नाही.
- साईपल्लवी