Breaking newsCrimeVidharbha

देऊळगाव तालुक्यात दे.मही परिसरातही शेतकऱ्यांना लावला सुमारे पाच कोटीचा चुना

बुलडाणा (जिल्हा प्रतिनिधी) शेतकऱ्यांना फसविण्याचा गोरखधंदा सध्या जोमात सुरु झाला आहे. कारण येथील डिग्रस रोडवर गोडावून भाड्याने घेवून परिसरातील शेकडो शेतकऱ्यांचा शेतमाल खरेदी करुन व्यापारयांनी पोबारा केला आहे. सुमारे ४ ते ५ कोटीने शेतकऱ्यांना चुना लावला आहे. चिखली येथील घटना ताजी असतांनाच देऊळगाव मही परिसरातील शेतकऱ्यांना गंडविल्याने हा प्रकार चर्चेचा ठरु लागला आहे. याबाबत ४० ते ५० शेतकऱ्यांनी पोस्टेला तक्रारी दाखल केल्या आहेत.
चिखली येथील व्यापारी संतोष बाबुराव रनमोळे व त्याचे साथीदार अशोक म्हस्के, ज्ञानेश्वर चेके सरंभा, अंबादास गरद खैरव यांनी दिग्रस रोडवर गोडावून भाड्याने घेवून शेतमाल खरेदी केला होता. हरभरा, भूईमूंग या व इतर प्रकारचा शेतमाल खरेदी करुन शेतकऱ्यांना त्यांच्या मालाची रक्कम प्रथम चेकव्दारे बटाव काढून देत होते. त्यानंतर अनेक शेतकऱ्यांना फोन पेव्दारे विंâवा त्यांच्या बँक खात्यात शेत मालाची रक्कम जमा केल्या जात होती. त्यामुळे शेतकऱ्यांचा विश्वास त्यांना संपादन केला. व नंतर ते १५ ते २० दिवसांच्या करारावर शेतकऱ्यांचा शेतमाल खरेदी करु लागले. परंतु आता गेल्या १५ ते २० वर्षापासून या सर्वांचे फोन बंद असून शेतमाल खरेदीही करणे बंद झाली आहे. शेतकरी सदर व्यापारयांचा शोध घेत असतांना ते कोठेही मिळत नाही. त्यामुळे शेतकरी चांगलेच आर्थिक अडचणीत सापडले आहे. दिलिप ढाकणे, रामकिसन जायभाये, परमेश्वर वाकोडे, ज्ञानेश्वर वाकोडे, भानुदास वाकोडे, विठ्ठल सोसे, रवि भालेराव, महादु बुधवत, बाळु झिने वाकी खुर्द, संजय गायकवाड, तेजराव मुंढे, शरद मुंढे, ज्ञानेश्वर गायकवाड, शे.शकिल, अमोल देशमुख मंडपगांव, हरसिंग सपकाळ डोढ्रा, रतन चेके, मधुकर चेके, कारभारी काकड, सखाराम चेके, आत्माराम चेके, बद्री नागरे, शिवहरि नागरे वाकी बुद्रुक, गजेंद्र मान्टे बायगांव, शिवाजी सानप, नारायणखेड, वायाळ चिंचखेड, देऊळगांव मही, धोत्रा नंदई, गारखेड इत्यादी गावचे अनेक शेतकऱ्यांची जवळपास ४ ते ५ कोटी रुपयाची फसवणुक करुन व्यापारी फरार झाले आहेत. यामध्ये जवळपास ५०-६० शेतकऱ्यांनी तक्रारी दाखल केल्या आहेत. तर जवळपास १५०-२०० शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे. याबाबत शेतकरी संघटनेचे देऊळगाव राजा तालुकाध्यक्ष तेजराव मुंडे यांनी फसवणूक झालेल्या शेतकरयांनी देऊळगाव राजा व देऊळगाव मही पोलीस चौकी येथे तक्रारी दाखल करण्याचे अहवान तसा विशेष नमुन्यात अर्ज सुध्दा त्यांनी शेतकऱ्यांना दिला आहे. सदर व्यापारयाकडून शेतकऱ्यांना त्याचा मोबदला मिळावा व त्यांच्याविरुध्द फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी शेतकऱ्यांक्या वतीने तेजराव मुंडे यांनी केली आहे. सदर व्यापारयावर फसवणुकीचा, लुबाडणुकीचा गुन्हा दाखल करावा असे शेतकरयांच्या वतीने तेजराव मुंढे यांनी शासनाकेडे मागणी केली आहे.

चिखली येथील घटनेची पुनरावृत्ती
संतोष रनमोडे याने चिखली तालुक्यातील शेतकरयांनाही १० कोटीचा चुना लावला आहे. या घटनेबाबत ९६ शेतकऱ्यांनी पोलिसात तक्रार सुध्दा केली आहे. हे प्रकरण तपासावर असतांना देऊळगाव मही परिसरातील या व्यापारयांचा दुसरा प्रकार उघडकीस आला आहे. संतोष रनमोडे याने शेतमाल घेवून पोबारा केला आहे. मात्र संतोष रनमोडेचे मुळगाव याबाबत सर्वच अनभिज्ञ आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!