BuldanaPolitical NewsPoliticsVidharbha

देऊळगाव मही तंटामुक्ती अध्यक्षपदी इंजि. अभिजीत शिंगणे विजयी

देऊळगावराजा (ब्रेकिंग महाराष्ट्र) – तालुक्यातील सर्वात मोठ्या ग्रामपंचायत असलेल्या देऊळगावमही तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी इंजिनिअर अभिजित शिंगणे यांची अत्यंत चुरशीच्या व अतितटीच्या निवडणुकीत विजयी होऊन निवड झाली आहे.

महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान हे गावातील लोकांना भांडणापासून व पर्यायाने गुन्ह्यापासून परावृत्त करणे व गावातील तंटा गावातच समोपचाराने मिटावे या उदात्त हेतूने महाराष्ट्र शासनाने सन २००७ पासून सुरु केली.  मात्र या अभियानाला राजकीय ग्रहण लागले असून तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदासाठी गावागावात आता तणावाचे वातावरण निर्माण होत आहे.  याचाच प्रत्यय तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या देऊळगाव मही येथे दिसून आले आहे.  मागील अनेक वर्षापासून तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदाची निवड ही ग्रामसभेत पार पडत असते.

मात्र 23 ऑगस्ट रोजी झालेल्या ग्रामसभेत तंटामुक्त समिती अध्यक्षाची निवड करण्यासंबंधाने चर्चा करण्यात आली.  तर अध्यक्ष पदासाठी अनेक नावे समोर आली. यानंतर तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्ष पदासाठी आलेली सर्व नावे मागे घेण्यासाठी वेळ देण्यात आला.  शेवटी अनिल शिंगणे यांनी युवा नेते अभिजित शिंगणे यांचे नाव सुचविले होते .  अभिजीत शिंगणे व सेवानिवृत्त शिक्षक तेजराव शिंगणे यांच्या मध्ये निवडणूक पार पडली.  यावेळी मतदानाद्वारे पार पडणाऱ्या या निवडणुकीसाठी निवडणुक निर्णय कमेटी बनविण्यात आली.  यामध्ये निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून सचिव विजय रिंढे यांनी काम पाहिले तर सरपंच , उपसरपंच , सर्व ग्रामपंचायत सदस्य यामध्ये स्थान देण्यात आले. शेवटी मतमोजणी द्वारे अभिजित शिंगणे यांना 152 मते मिळाली तर तेजराव शिंगणे यांना 123 मते मिळाली.  या अटीतटीच्या लढतीत अभिजित शिंगणे यांनी विजय मिळवला. या वेळी सर्वांनी अभिजित शिंगणे यांचे अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!