बुलडाणा जिल्हयातुन जाणाऱ्या मार्गासाठी भूमी अधिग्रहणाचे देण्यात आले आदेश
बुलडाणा (ब्रेकींग महाराष्ट्र) अकोला खांडवा ब्रॉडगेज कामाचा तिढा अखेर सुटला असून बुलढाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या या रेल्वे मार्गासाठी भूमी अधिकृत करण्याचे आदेश गृहमंत्री अमित शहा यांनी दक्षिण मध्य रेल्वेला दिले आहे केंद्रीय ग्रामविकास समितीचे अध्यक्ष खासदार प्रतापराव जाधव यांनी या संदर्भात बैठक बोलवण्याची मागणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केली होती त्यानुसार बैठक संपन्न होऊन या बैठकीमध्ये हे निर्देश देण्यात आले आहेत मेळघाट व्याघ्र प्रकल्पातून रेल्वे मार्ग नेण्यासाठी परवानगी देण्यात आली नसल्याने अडकून पडलेल्या ‘ब्रॉडगेज’ कामाचा तिढा अखेर सुटला आहे.
मागील अनेक वर्षांपासून अकोला ते खंडवा मीटर गेज रेल्वे मार्ग ब्रॉडगेज करण्यात आकोट ते अमलाखुर्द या ७७ किमी रेल्वे मार्गावर मेळघाट अभयारण्य अर्थात व्याघ्रप्रकल्प असल्याने ब्रॉडगेजचे काम करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने परवानगी दिली नाही.यामुळे मागील काही वर्षांपासून आकोट ते अमलाखुर्द ब्रॉडगेजचे काम रखडले आहे. हा तिढा सोडवण्यासाठी अडगांव, हिवरखेड,सोनाळा ,जामोद ते खकनार व खिकरी वरुन तुकाईथड असा पर्यायी मार्ग सूचित करण्यात आला.परंतु जमीन व वाढीव खर्चाचा भार सहन कोन करणार? या प्रश्नावर तोडगा निघाला नाही. या रेल्वे मार्गाचे काम तात्काळ पूर्ण करावा अशी मागणी केंद्रीय ग्रामविकास समितीचे अध्यक्ष खासदार प्रतापराव जाधव यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेटून केली होती त्यानंतर नवी दिल्ली येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्लीत पश्चिम विभागातील विविध मुद्द्यांवर बैठक घेतली होती.या बैठकीत खंडवा ते अकोला रेल्वे मार्गावरील मेळघाटातील ब्रॉडगेजच्या थांबलेल्या कामाला घेऊन सविस्तर चर्चा करण्यात आली. तेव्हा नवीन पर्यायी मार्गाचा किंवा इतर काही करता येईल का ? यावर तातडीने कारवाई करत थांबलेले काम सुरू करा.असे निर्देश गृहमंत्री अमित शाह यांनी दिले.तेव्हा केंद्र सरकार आणि रेल्वे बोर्डाने प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी होत असलेला विलंब लक्षात घेऊन परिवर्तित मार्गावरुन ब्राडगेजचे काम सुरू करण्यास दक्षिण मध्य रेल्वे (एससीआर)च्या सिकंदराबाद निर्माण विभागाला निर्देश दिले. यामुळे एससीआरने आराखडा करत सर्वेची प्रक्रिया सुरु केली आहे.
नवीन रुटमुळे जवळपास २९ कि.मी अंतर वाढणार आहे. नवीन मार्ग अड़गांव येथून परिवर्तित होवून तुकाईथडला जोडल्या जाणार आहे. सध्या खंडवा-अकोला अंतर १७४ असून परिवर्तित मार्गानंतर २०६ किमी होईल नविन रेल्वे मार्ग हा बुलडाणा जिल्ह्यातून जाणार आहे नवीन मार्गासाठी भूसंपादन केल्या जाणार आहे. रेल्वे बोर्डाने या प्रकल्पाची अतिआवश्यक कामात नोंदणी केली असून दक्षिण मध्य रेल्वेला जुन्या सर्वेक्षणचा लवकरात लवकर रिव्यू आणि दोन्ही राज्य सरकारकडून वन विभागाची परवानगी घेऊन भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत.