मेरा बुद्रूक, ता.चिखली (प्रताप मोरे) – स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त मेरा बुद्रूकसह परिसरातील गुंजाळा , चंदनपूर , मंगरूळ इसरुळ , या गावामध्ये सतत तीन दिवस सरपंच व शाळेच्या सभापतीनी स्वतःच्या मान सन्मानाचा त्याग करून गावातील आजी माजी सैनिक , ग्रा.प. उपसरपंच व सदस्यांना मान देवून राष्ट्रध्वज फडकविला तसेच अनोखे विविध उपक्रम पार पडले.
चिखली तालुक्यातील मेरा बु , गुंजाळा , मंगरूळ ई , चंदनपूर या गावांमध्ये स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ग्रा.प. सरपंच व शाळा सभापती यांच्या अध्यक्षतेखाली या कृतज्ञता सोहळ्याचे सतत तीन दिवस आयोजन करण्यात आले होते. या तीन दिवसामध्ये ग्रा.प. आणि शाळा इमारतीवर राष्ट्रध्वज फडकविण्याच्या सूचना शासनाकडून देण्यात आल्या होत्या. त्यामुळे या गावाच्या सरपंच व शाळा प्रशासनाने गावातून विद्यार्थ्यांची ढोल ताशांच्या गजरात प्रभातफेरी , घराघरापुठे रांगोळी , पेन पुस्तके वाटप , शाळेत व ग्रा.प. मध्ये विविध अनोखे उपक्रम राबविण्यात आले . तसेच राष्ट्रध्वज फडकवीचा मानसन्मान गावाच्या सरपंच व सभापती यांना असतांना सुध्दा हा मानसन्मान मिळविण्यासाठी पदाधिकारी वाटेल ते करतात आणि मानसन्मान घेतात.
यावर्षी भारत देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष झाले आणि देशामध्ये ७५ वा हा १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन अमृत महोत्सव म्हणून आनंदात साजरा व्हावा व जनतेच्या मनात देश भावना जागृत राहावी यासाठी शासनाने हर घर तिरंगा हा उपक्रम राबवावा अशा सूचना सरकार कडून देण्यात आल्या होत्या. त्यामुळे आपणही अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी काहीतरी केले पाहिजे हा संकल्प करुण गुंजाळा सरपंच दिपक केदार आणि जि.प. शाळेचे सभापती गजानन केदार यांनी स्वतःच्या मान सन्मानाचा त्याग करुण सतत तीन दिवस गावातील आजी माजी सैनिक , ग्रा.प.उपसरपंच , व सदस्यांना मान देवून त्यांच्या हस्ते ग्रा.प.वर आणि शाळेत राष्ट्रध्वज फडकविला . हा अभिनव उपक्रम पाहून गावकरी आच्छर्य चकित झाले.
याप्रसंगी विनायकराव पडघान , राजेंद्र पडघान , ज्ञानेश्वर पडघान , बद्रीप्रसाद पडघान , पत्रकार प्रताप मोरे , सरपंच दिपक केदार , उपसरपंच सुनिल केदार , ग्रा.प. सदस्य तंटामुक्ती अध्यक्ष उपाध्याक्ष साहेबराव पवार , पो पा केदार , राशन दुकानदार सुनिल केदार , शाळा सभापती गजानन केदार ,नारायण मोरे , विलास गवई, सचीन गवई, ज्ञानेश्वर पवार ,सिध्दांर्थ गवई , बबन मोरे , विजयानंद मोरे , आटोळे उपसभापती सुनिल मोरे , सैनिक राजू मोरे , माजी सैनिक बद्रीप्रसाद इलग , शाळेचे प्राचार्य शेख , पर्यवेक्षक सोळंकी , शिक्षिका सोळंकी मॅडम , मोहोड , केदार , पडघान , इंगळे , बुधवत , नागरे मॅडम , गुंजाळा शाळेचे मुख्याध्यापक इंगळे , शेळके , चंदनपूर इंग्रजी शाळेचे आकाश गवई, डोगरदिवे मॅडम , गवई मॅडम , पैठणे मॅडम , मंगरूळ शाळेचे मुख्याध्यापक वानखेडे , सरपंच सौ माधुरीताई वरपे , प्रवीण बोर्डे , तथा गावातील मोठ्या महिला पुरुष तरूण वर्ग उपस्थित होता. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी डी खरात सर यांनी केले, तर उपस्थितांचे आभार प्राचार्य शेख यांनी मानले.