भारतीय स्वातंत्र्याचा व गो.से महाविद्यालयाचा अमृतमहोत्सवानिमित्त भव्य ‘तिरंगा रॅली’ संपन्न
खामगाव (ब्रेकिंग महाराष्ट्र):- भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव संपूर्ण देशभर मोठ्या आनंदाने साजरा होत आहे. महाविद्यालयाने 75 मीटर तिरंगा ध्वज तयार करून एक आगळीवेगळी भव्य दिव्य रॅली खामगाव शहरातून काढली. बुलढाणा जिल्ह्यातील ही भव्य दिव्य रॅली जिल्ह्यातील आकर्षण ठरले आहे. या रॅलीला जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांच्या प्रमुख उपस्थितीत व शुभ हस्ते हिरवी झेंडे दाखवून ही तिरंगा रॅली शहरातून मार्गस्थ झाली.
देशासाठी आपलेआयुष्य वेचणाऱ्या देशभक्तांचे स्मरण, त्यांच्या बलिदानाची आठवण म्हणून संपूर्ण देशभर घर घर तिरंगा हा उपक्रम राबविला जात आहे. गो. से. महाविद्यालयालयास स्थापन होऊन 75 वर्षे झाली आहेत. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पर्वावर ,महाविद्यालयाचाही अमृत महोत्सव साजरा होत आहे. हा दुग्ध शर्करा योग आहे असे प्राचार्यांनी प्रास्ताविकास सांगितले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी, विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुभाष बोबडे उपस्थित होते. महाविद्यालयाचे सर्व संचालक मंडळ या रॅलीत सहभागी झाले होते. महाविद्यालय प्रांगणातून आकर्षक वेशभूषा केलेल्या विद्यार्थ्यांच्या खांद्यांवर तिरंगा ध्वज देण्यात आला होता. त्यावेळी संपूर्ण महाविद्यालयात आनंदाचे उत्साहाचे वातावरण होते. जवळपास साडेचार हजार विद्यार्थी तिरंगा ध्वज खांद्यावर घेऊन संपूर्ण शहरातून विविध घोषणा देत उत्साहाने रॅली सहभागी झाले होते. तिरंगा रॅलीत खामगाव चे आमदार श्री आकाश दादा फुंडकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती उपविभागीय अधिकारी राजेंद्र सिंग जाधव खामगाव , तहसीलदार, शहरातील पोलीस स्टेशनचे सर्व ठाणेदार, पत्रकार बांधव व खामगावातील गणमान्य व्यक्ती या तिरंगा रॅली सहभागी झाले होते .महाविद्यालय मार्फत हा भव्य दिव्य असा उपक्रम राबविण्यात आला. विविध महापुरुषांच्या वेशभूषा विद्यार्थ्यांनी करून महापुरुषांचे स्मरण केले. चौका चौकात नागरिकांनी रॅलीचे उत्स्फूर्त स्वागत केले. गुलाब पुष्पांची तिरंग्यावर उधळणही केली सेवाभावी संस्थांनी विद्यार्थ्यांना शरबत, एनर्जी ड्रिंक बिस्किट ,पाणी याची व्यवस्था केली होती..महाविद्यालयाच्या वतीने विद्यार्थ्यांनी या तिरंगा रॅलीत सर्वधर्मसमभाव या तत्त्वाची शिकवण देणारी पथनाट्य सादर केली. देशासाठी ज्यांनी बलिदान दिले त्यांच्या स्मरण आम्ही सतत करत राहू. हा तिरंगा सूर्य चंद्र असेपर्यंत कायम राहील. सर्वधर्म समभावाची शिकवण हे भारतीय लोक जीवनाचे मूळ तत्व आहे. असे भावपूर्ण उद्गार आमदार ॲड. आकाश फुंडकर यांनी काढले. जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरीया साहेब म्हणाले की, ज्या महापुरुषांनी आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिले त्यांच्यामुळेच आपण स्वातंत्र्य अनुभवत आहोत. आपल्या सर्वांसाठी देश सर्वोच्च स्थानी असला पाहिजे. देशाचा स्वाभिमान हा आपल्या वर्तन व्यवहारातून दिसला पाहिजे. एकता आणि अखंडता या तत्त्वाने आपण पुढे जाऊ, असे विचार त्यांनी मांडले. तिरंगा रॅली मार्गात भगतसिंग चौकात संस्थेचे सचिव डॉ. प्रशांत बोबडे यांच्या शुभहस्ते वीर भगतसिंग यांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण करण्यात आला. गांधी चौकातील गांधी पुतळ्याला प्राचार्यांच्या हस्ते पुष्पमाला अर्पण करण्यात आली व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरप्रसाद मैदान येथे या रॅलीची सांगता झाली. येथील बाबासाहेबांच्या पुतळ्याला महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी पुष्प माला अर्पण केली. कार्यक्रमाचे संचालन ,अमृत महोत्सव समितीचे समन्वयक डॉ. हनुमंत भोसले यांनी केले होते. या रॅलीमध्ये महाविद्यालयातील सर्व कर्मचारी व शहरातील गणमान्य व्यक्ती. संस्थेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. गुरुद्वारा मार्फत विद्यार्थ्यांना पुरी भाजीचे वाटप करण्यात आले. यासाठी प्रसिद्ध उद्योजक विनोद डिडवानिया यांनी सहकार्य केले होते .या कार्यक्रमाच्या सांगता समारोपाला आमदार आकाश फुंडकर यांनी संबोधित केले. राष्ट्रगीताने या कार्यक्रमाची सांगता झाली. असे प्रसिद्धी प्रमुख प्रा. विक्रम मोरे यांनी कळविले आहे.