BuldanaChikhaliVidharbha

ओला दुष्काळ जाहीर करून शेतकर्‍यांना एकरी २५ हजार रुपये मदत जाहीर करा: डॉ. विकास मिसाळ यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

चिखली (तालुका प्रतिनिधी) – तालुक्यातील शेळगाव आटोळ व मेरा खुर्द महसूल मंडळात ४ ऑगस्टरोजी ढगफुटीसदृश पाऊस झाला. तसेच, त्यानंतरही सातत्याने संततधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे शेतीपिकांचे ७० ते ८० टक्के नुकसान झालेले आहे. त्यामुळे शेतीपिके हातातून गेली आहेत. शेतकर्‍यांचे फार मोठे आर्थिक नुकसान झाल्याने या दोन्ही महसूलमंडळात ओला दुष्काळ जाहीर करावा व शेतकर्‍यांना तातडीने एकरी २५ हजारांची मदत द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष डॉ. विकास मिसाळ यांनी केली आहे. याबाबत त्यांनी तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले आहे.
ढगफुटी व संततधार पाऊस यामुळे शेतकर्‍यांचे फार मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. या अस्मानी संकटात सापडलेल्या सर्वच शेतकर्‍यांना सरसकट २५ हजार रूपये आर्थिक मदत देण्यात यावी. तसेच दोन्ही महसूल मंडळात ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत तहसीलदार, चिखली यांच्यामार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. या निवेदनावर डॉ. विकास मिसाळ, राजीव जावळे, सुरेश भुतेकर, सतीश भुतेकर, भिकणराव भुतेकर, शेनफड पाटील, ज्ञानेश्वर वरपे, सुरेश राजे, संतोष बोर्डे, कृष्णा मिसाळ, पांडुरंग देशमुख, कैलास बोर्डे, शरद गावडे, उद्धव घुबे, शिवदास भांदर्गे, भागवत थुट्टे, भास्कर जावळे, तुळशीदास जावळे, देवानंद गवते, अमोल थुट्टे, विशाल थुट्टे, परमेश्वर वानखेडे, दादाराव सुरडकर, गजानन जावळे, सिद्धार्थ वानखेडे, संजय जावळे, अरुण वराडे, प्रभाकर काळे, रामदास झाल्टे, भागवत घुबे, राम सांगळे, श्रीधर जगदाळे, भागवत माने, गणेश निकम, दत्तात्रय इंगळे, ज्ञानेर्श्वर शिंदे, लक्ष्मण पेहरे, पुंजाराम पेहरे, ज्ञानेश्वर साप्ते इत्यादी शेतकर्‍यांच्या सह्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!