बुलडाणा (ब्रेकिंग महाराष्ट्र):- जिल्ह्यातील शेगाव तालुक्या अंतर्गत येत असलेल्या कालखेड गट ग्रामपंचायत मधील गोळेगाव खुर्द हे गाव असून पुनर्वसित आहे. सातत्याने मन नदीला महापूर येत होता तेव्हा 15 ते महिनाभर गावाचा संपर्क तुटत होता तेव्हा प्रशासणाने गोळेगावाच् पुनर्वसन केल. तेव्हा पासून या गावाला जाण्यासाठी अजिबात रस्ता नाही. पावसाळ्यात तर नागरिकांना चिखलातून पायवाट काढतांना मोठी कसरत करावी लागते. एखाद्या आजारी व्यक्तीला दवाखाण्यात न्यायचे म्हटले की चार खांदेकरी करून खाटेवर त्या रुग्णाला घेऊन जावे लागते. शाळेतील विद्यार्थ्यांचे शिक्षण पावसाळ्यात बंद ठेवावे लागत आहे . 75 वर्षापासून गावाला रस्ता नाही ही एक शोकांतिका म्हणावी लागेल,
लोकप्रतिनिधी निवडणुकीच्या वेळेसच एकदा येऊन जातात मोठी आश्वासने देतात मात्र 5 वर्ष कोणीही डुंकूनही या गावाकडे फिरकत नाहीत मात्र ही व्यथा शासन दरबारी दरवर्षी ग्रामस्थ मांडत आलेत मात्र प्रशासनाची व लोकप्रतिनिधीची उदासिनता कायम आहे.
दर पावसाळ्यात दोन ते तीन किमी प्रवास चिखलातून करावा लागतो नदी नाले शेतशिवारातून वाट काढून पुढे चालावे लागत आहे, तीन पिढ्या निघून गेल्यात मात्र गोळेगावचा रस्ता झाला नाही आजही रस्ता कधी होईल। याकडे गोळेगाव वासियांचे लक्ष लागून आहे.
यावर्षी देशाला 75 वर्ष स्वातंत्र्य मिळवून पूर्ण झालेले असून यावर्षी अमृत महोत्सव खूप मोठ्या उत्साहाने देशभरात साजरा करण्यात येत आहे , शासनाकडून अनेक शासकीय प्रलंबित असलेली कामे या अमृत महोत्सवी वर्षात निकाली काढण्यासाठी कॅम्प राबविण्यात येत आहेत. अशाच एखादा कॅम्प शासनाकडून ज्या गावांना रस्ते नाहीत ज्या रस्त्याची कामे प्रलंबित आहेत अशासाठी शासनाकडून काही उपाययोजना राबवण्यात येतील का ? असा प्रश्न येथिल रस्त्याअभावी पीडित असलेले ग्रामस्थ करीत आहेत. गोळेगाव खुर्द वासियांना या अमृत महोत्साहाच्या आतुरतेनेच आपल्या गावचा रस्ता या अमृत महोत्सव वर्षात होईल का असा प्रश्न या गावकऱ्यांकडून होत आहे अमृत महोत्सवात संबंधित प्रशासन या रस्त्याची दखल घेईल का असा प्रश्न गावकऱ्यांकरी करीत आहेत.