बुलडाणा(ब्रेकिंग महाराष्ट्र):- अंगणवाडी सेविका मदतनीस यांना ग्रॅज्युएटी लागू करावी, मिनी अंगणवाडीचे रूपांतर अंगणवाडीत करण्यात यावे, अंगणवाडी सेविकांना लॅपटॉप देण्यात यावे, सेविका मदतनीस यांच्या रिक्त जागा भरण्यात याव्या या इतर मागण्यांसाठी क्रंतिदिनी म्हणजेच 9 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी युनियन आयटकच्या वतीने बुलडाणा शहर पोलीस स्टेशनमध्ये जेलभरो आंदोलन करण्यात आले. क्रांती दिनी अंगणवाडी सेविका या सकाळी शहर पोलीस स्टेशन येथे एकत्र येत जोरदार घोषणाबाजी केली. जोरदार घोषणाबाजीमुळे पोलीस स्टेशन दणाणून गेले होते.
अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या शिष्टमंडळाच्या वतीने पोलीस निरीक्षक यांच्यामार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन पाठविण्यात आलेल्या निवेदनात, अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या वाहतूक प्रवास भत्त्यामध्ये वाढ करण्यात यावी, अंगणवाडीचे बांधकाम उच्च दर्जाच्या करण्यात यावे, बांधकाम हे कंत्राट पद्धतीने देता अंगणवाडी सेविका मदतनीस किंवा प्रकल्प अधिकारी यांच्याकडे देण्यात यावे, नागरी प्रकल्प मध्ये शासनाने अंगणवाडी भाडेतत्त्वावर घेतली आहे, त्यामध्ये भाडेवाढ करण्यात यावी, एज्युकेशन पॉलिसी एज्युकेशन पॉलिसी अमलात आणण्यात यावी, अंगणवाडी सेविका मदतनीस यांना अतिरिक्त चार्जचा मोबाईल देण्यात यावा, अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या रिक्त जागा भरण्यात याव्या, गोवा राज्याप्रमाणे महाराष्ट्रात मानधन वाढ करण्यात यावी, आहारामध्ये दिलेला गहू दळून देण्यात यावा, सखी पेन्शन योजना लागू करण्यात यावी, सखी पेन्शन 3 हजार 499 देण्यात यावे, वैद्यकीय रजा मंजूर करण्यात यावी, पंतप्रधान सुरक्षा योजना लागू करण्यात याव्या, जीवन ज्योती विमा लागू करण्यात यावे, अंगणवाडी सेविका स्पष्टीकरण करावे कोविड आजाराचा संसर्ग संपेपर्यंत अंगणवाडी सेविका मदतनीस यांना विमा कवच सुरू ठेवावे, केंद्र सरकारच्या नवीन शैक्षणिक धोरणात अंगणवाडी हे शाळेला जोडण्याचा निर्णय घेतलेला आहे, अंगणवाडी शाळेला जोडल्या तर सेविकांना शिक्षकाचा दर्जा देण्यात यावा व मानधन मदत यांना चतुर्दश्रेणीची वेतन देण्यात यावा अशा मागणी यावेळी करण्यात आल्या. यावेळी निवेदन देताना कॉ. सुरेखा तळेकर, कॉ.अलका राऊत, कॉ.नंदकिशोर गायकवाड, कॉ. शशिकला मोरया, शालिनी सरकटे, तुळसाबाई भोपळे, संगीता ठाकूर, नंदा देशमुख, आशा टकले, सुषमा गोडगे, रेखा मुंडे, मालती भारद्वाज, ज्योती खोडके, सिंधुबाई आहेर, डी.डी. मराठे यांच्यासह असंख्य अंगणवाडी सेविका व मदनिस सहभागी झाल्या होत्या.