राहुल यांची सलग दुसर्या दिवशीही ईडी चौकशी; काँग्रेस नेत्याला पोलिसांनी फरफट नेले!
नवी दिल्ली (विशेष प्रतिनिधी) – नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी ईडीकडून सलग दुसर्या दिवशी काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांची चौकशी करण्यात येत आहे. काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी-वढेरा यांनी राहुल यांना स्वतः ईडीच्या कार्यालयात सोडले. दरम्यान, केंद्र सरकारच्या विरोधात पायी मार्च काढणार्या काँग्रेस नेते तथा प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांना पोलिसांनी फरफटत नेत पोलिस व्हॅनमध्ये बसवले. अनेक नेते व कार्यकर्ते पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत.
राहुल गांधी यांच्या ईडी चौकशीवरून काँग्रेस संतप्त झाली असून, काँग्रेस मुख्यालया शेजारी लावलेले बॅरिगेटसवर रोखण्यात आल्याने छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेलसह इतर नेत्यांची दिल्ली पोलिसांशी बाचाबाची झाली. एका मुख्यमंत्र्याला रोखण्यात आल्याने काँग्रेसने तीव्र संताप व्यक्त केला आहे.
गेल्या दोन दिवसांपासन ईडी ही राहुल गांधी यांची चौकशी करत आहे. हा प्रकार म्हणजे काँग्रेसवर केंद्राची दडपशाही असल्याची टीका काँग्रेसने केली आहे. काँग्रेसचे अनेक प्रमुख नेते दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत.
हमारे शांतिपूर्ण सत्याग्रह को भाजपा की गुंडा पुलिस बर्बरता से रोकना चाह रही है।
देखिए भाजपा की पुलिस किस तरह से हमारे से साथ दुर्व्यवहार कर रही है।
अब ये सत्याग्रह अंतिम सांस तक जारी रहेगा!#IndiaWithRahulGandhi pic.twitter.com/D3o8AG8lmU
— Anil Chaudhary (@Ch_AnilKumarINC) June 14, 2022