महायुतीच्या उमेदवार श्वेताताई महाले यांनाच प्रचंड बहुमताने विजयी करा!
- साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांचे नातू सचिन साठे यांचे आवाहन
– अमडापूर, पेठ, शेलूद, रायपूर येथील बैठकींना उत्स्फूर्त प्रतिसाद
चिखली (तालुका प्रतिनिधी) – चिखली विधानसभा मतदारसंघातील महायुतीच्या भाजपच्या उमेदवार सौ. श्वेताताई महाले पाटील यांच्या प्रचारार्थ तसेच मातंग समाजाच्या बांधवांशी संवाद साधण्यासाठी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नातू सचिनभाऊ साठे यांनी मतदारसंघातील चार गावांत महत्वपूर्ण बैठकी घेतल्या. यावेळी त्यांनी महायुतीच्या उमेदवार श्वेताताई महाले पाटील यांनाच प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले.
सचिनभाऊ साठे यांनी चिखली विधानसभा मतदारसंघातील अमडापूर, पेठ, शेलूद, आणि रायपूर या ठिकाणी मातंग समाजबांधवांशी संवाद साधला. या संवादात त्यांनी श्वेताताई महाले पाटील यांच्या कामकाजाचा विशेष उल्लेख केला. ‘महायुतीच्या सरकारने मातंग समाजासाठी अण्णाभाऊ साठे अभ्यास प्रशिक्षण संस्था स्थापन केली, रशियातील मॉस्को येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा स्थापन केला, लहुजी साळवे यांच्या स्मारकासाठी कोटींचा निधी दिला आणि अनुसूचित जाती मातंग समाजासाठी वर्गीकरण अबकडच करण्याचा निर्णय घेतला, असे सचिन साठे यांनी सांगितले. त्याचबरोबर, त्यांनी महायुती सरकारच महाराष्ट्रात येणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे स्पष्ट केले. सचिन साठे यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका करत सांगितले की, ‘काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडी फक्त महामानवांचे नाव घेऊन सत्ता मिळवतात. परंतु निवडणूक आल्यावर त्याच महापुरुषांच्या नावांचा उपयोग केल्यानंतर ते त्यांच्या पाठीमागेदेखील वळत नाहीत. महाविकास आघाडीने समाजाला लाथाडले आहे. मातंग समाजासाठी महाविकास आघाडीने काहीच केले नाही.’ सचिन साठे यांनी महाविकास आघाडीला महाराष्ट्रातून हद्दपार करायचा निर्धार व्यक्त केला. चिखली तालुक्यात श्वेताताई महाले पाटील यांच्या नेतृत्वात मातंग समाजासाठी विविध योजनांचा लाभ मिळवून दिला आहे. श्वेताताईंनी समाजाला न्याय देत, अनेक समाज सभागृह, घरकुल, रस्ते व इतर योजनांचा लाभ मिळवून दिला, असेही सचिन साठे म्हणाले.
याप्रसंगी चिखली पंचायत समितीच्या सभापती सिंधुताई तायडे म्हणाल्या, ‘श्वेताताई महाले पाटील यांनी मातंग समाजाच्या अडीअडचणी सोडवल्या आहेत आणि त्यांनी मला चिखली पंचायत समितीचे सभापती पद दिले. यामुळे त्यांची खरी न्यायप्रियता सिद्ध झाली आहे.’ यावेळी उपस्थित समाज बांधवांनी श्वेताताईंना पुन्हा आमदार करण्याचा निर्धार केला आहे. या कार्यक्रमात भाजपा नेते अंकुशराव तायडे, अॅड .दिलीप यंगड, अॅड .डिगंबर आंभोरे, पत्रकार छोटू कांबळे, नितिन साळवे, रमेश साळवे, किशोर साळवे, मारोती कांबळे, राम खंडारे, सुभाष अवसरे, सचिन कांबळे,किरण बोरकर, मारुती तायडे, श्रीकृष्ण तायडे, बंटी बोरकर, तोताराम घाडगे, रामेश्वर घाडगे, योगेश घाडगे, शरद तायडे, योगेश तायडे, दादाराव साळवे, यांच्यासह अनेक मान्यवर व समाज बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अॅड . डिगंबर आंभोरे यांनी केले, तर आभार सिंधुताई तायडे यांनी मानले.
श्वेताताई महाले पाटील यांच्या कार्याचे महत्त्व!
श्वेताताई महाले पाटील यांच्या कार्याची ओळख गावागावात झाली असून, त्यांनी केवळ मातंग समाजासाठीच नव्हे तर संपूर्ण चिखली तालुक्याच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण पाऊले उचलली आहेत. मातंग समाजाच्या प्रगतीसाठी त्यांनी केलेली मेहनत, विशेषतः विविध योजनांचा लाभ, हे त्यांच्या नेतृत्वाचे प्रतीक आहे. यावरूनच, श्वेताताई महाले पाटील यांना आगामी निवडणुकीत मातंग समाज आणि सर्वच समाजाच्या पाठिंब्याचा विश्वास आहे.