चिखली (तालुका प्रतिनिधी) – चिखली विधानसभा मतदारसंघातील ‘महायुती’च्या भाजपच्या उमेदवार तथा विद्यमान आमदार यांच्या जनआशीर्वाद दौर्याला गावखेड्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद तर मिळतच आहे; पण चिखली शहरातूनही ताईंना जनमाणसाचे भरभरून आशीर्वाद प्राप्त होत आहेत. महायुतीच्या फक्त अडिच वर्षाच्या सत्ताकाळात श्वेताताईंनी चिखली शहरासह मतदारसंघात विकासकामांचा डोंगर उभा केला. त्यामुळे आमचे मत फक्त श्वेताताईंनाच मिळेल, अशी निसंदिग्ध ग्वाही मायबाप मतदारांसह महिला, तरूणवर्ग, शेतकरी, कष्टकरी अशा सर्वांनी श्वेताताई महाले यांना या गावभेट दौर्यातून दिली आहे.
जनआशीर्वाद दौर्यानिमित्त चिखली शहरातील नगरपरिषद चौक व खडकपुरा या भागात बैठक घेऊन आ. श्वेताताई महाले पाटील यांनी नागरिकांशी सुसंवाद साधला. यावेळी या भागामध्ये आपण केलेल्या अभूतपूर्व अशा विकासकामांचा दाखला देत, आगामी निवडणुकीत आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन त्यांनी नागरिकांना केले. तसेच या भागाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण भविष्यात्देखील कटिबद्ध राहणार असल्याबद्दल सर्वांना आश्वस्त केले. यावेळी महायुतीचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. तर सर्व मतदारांनी आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत, अशी ग्वाही श्वेताताईंना यावेळी दिली. खरे तर, आमदार म्हणून निवडून आल्यानंतरच्या पाच वर्षांपैकी केवळ अडीच वर्षाचा कार्यकाळ श्वेताताईंना खर्याअर्थाने विकासकामे करण्यासाठी मिळाला. तरीदेखील त्या अत्यल्प कालावधीत जेवढी विकासकामे त्यांनी केलीत, त्याच्या निम्मी कामेदेखील काँग्रेसच्या विद्यमान उमेदवारांनी ते आमदार असतानाच्या दहा वर्षात केली नाहीत. त्यामुळे केलेल्या विकासकामांच्या बळावर या निवडणुकीमध्ये श्वेताताईंचा विजय निश्चित असल्याची ग्वाही चिखली शहरासह ग्रामीण भागातील मतदार देत आहेत. तसेच, राज्यातील महायुती सरकारने शेतकरी, कष्टकरी, महिला, युवक, मागासवर्गीय, अल्पसंख्याक या प्रत्येक समाजघटकासाठी विविध कल्याणकारी योजना आणल्या. या प्रत्येक योजनेची चिखली मतदारसंघात प्रभावी अंमलबजावणी झालेली आहे. प्रत्येक पात्र लाभार्थीपर्यंत योजनेचा लाभ पोहोचण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले गेले. याशिवाय, मतदारसंघात रस्ते, वीज, पाणी आदी मूलभूत सुविधांचा अनुशेषदेखील भरून काढला गेला. त्यामुळे प्रगतीचा मार्ग खुला झाला असून, या प्रगतीला अधिक वेग मिळावा म्हणून पुन्हा एकदा श्वेताताईंनाच निवडून देण्याचा निर्धार मतदारांनी केला असल्याचे दिसून येत आहे.
चिखली तालुक्यातील मौजे खैरव, मौजे आमखेड, मौजे मुगसरी येथेदेखील आ. श्वेताताईंनी ग्रामस्थांशी संवाद साधला. या भागात महायुतीच्या सरकारच्या काळात विविध विकासकामे केली गेली आहेत. त्यात गावजोड रस्ते, गावअंतर्गत रस्ते, सभामंडप, पर्यटन अंतर्गत कामे, पांधण रस्ते अशा विविध कामे तत्परतेने मार्गी लावली गेली आहेत. येणार्या काळातदेखील विकासकामाची मालिका अशीच सुरू राहणार असल्याचे आश्वासन श्वेताताईंनी गावकर्यांना यावेळी दिले. आपण मला भरभरून मतदानरुपी आशीर्वाद द्याल, असा विश्वास त्यांनी याप्रसंगी व्यक्त केला. त्याला सर्व ग्रामस्थांनी एकसुरात होकार दिला. याप्रसंगी महायुतीचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच, मौजे रानअंत्री व मौजे अंबाशी येथेदेखील ग्रामस्थांशी संवाद साधत श्वेताताईंनी मतदारांना आशीर्वाद मागितले. महायुती सरकारच्या काळात आपण या गावांमध्ये केलेल्या कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांमुळे येथील जनतेचे मला भरभरून आशीर्वाद लाभतील याची खात्री आहे, असे श्वेताताईंनी सांगताच, तुम्हाला भरभरून मतदान करू, अशी ग्वाही ग्रामस्थांनी श्वेताताईंना दिली. गावखेड्यातील सर्व दौर्यांतून श्वेताताईंना जोरदार प्रतिसाद लाभत असून, विरोधकांच्या कोणत्याही अपप्रचाराला बळी न पडण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला असल्याचे दिसून येत आहे.