Head linesLONARMEHAKARPolitical NewsPoliticsVidharbha

हा धनशक्तिविरूद्ध जनशक्तीचा लढा – डॉ. ऋतुजा चव्हाण

- मेहकर-लोणार मतदारसंघाचा विकास झाला नाही, हे सत्ताधार्‍यांचे अपयश!

– मेहकर येथील पत्रकार परिषदेत व्यक्त केली राजकीय भूमिका!

मेहकर (तालुका प्रतिनिधी) – मेहकर-लोणार मतदारसंघात मुलभूत सुविधांचा अभाव आहे. येथील जनतेचा विकास झालेला नाही, महिलांचे प्रश्न सुटलेले नाहीत, शैक्षणिक सुविधा उपलब्ध नाहीत, आरोग्याच्या समस्या सुटलेल्या नाहीत. या मतदारसंघातील रस्ते, वीज, पाणी, विविध समस्या जैसे थे आहेत. एखाद्या गावात सभामंडपसाठी निधी दिला म्हणजे विकास झाला असे होत नाही. गावागावात स्मशानभूमी नाहीत. त्यामुळे येथील कोणतीच विकासाची कामे झालेली नसल्याने हे सत्ताधार्‍यांचे अपयश आहे. आता सत्ताधार्‍यांनी विकासाच्या गप्पा करू नये, आता विधानसभा निवडणुकीत धनशक्तीविरूद्ध जनशक्ती अशीच लढाई आहे, असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीच्या मेहकर-लोणार मतदारसंघातील उमेदवार तथा शेतकरी नेत्या डॉ. ऋतुजा ऋषांक चव्हाण यांनी केले. यावेळी त्यांनी नामोल्लेख टाळून सत्ताधारी आमदारांवर जोरदार टीकास्त्र डागले.

मेहकर येथे वंचित बहुजन आघाडीच्यावतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना डॉ. ऋतुजा चव्हाण यांनी आपली भूमिका सविस्तरपणे मांडली. यावेळी शेतकरी नेते ऋषांक चव्हाण यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे जेष्ठ नेते भाई महेंद्र पनाड, तालुकाध्यक्ष मोबीन भाई, लोणार तालुकाध्यक्ष दिलीप राठोड, युवा तालुकाध्यक्ष आबाराव वाघ, जेष्ठ नेते वसंतराव वानखेडे, अ‍ॅड. बबनराव वानखेडे, मिलिंद खंडारे, पवन अवसरमोल, गौतम गवई यांच्यासह मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. डॉ. ऋतुजा चव्हाण म्हणाल्या, की सर्वप्रथम मी श्रध्येय बाळासाहेब आंबेडकर यांचे मनस्वी आभार मानते. आज खर्‍याअर्थाने मेहकर मतदारसंघातील महिलांना अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनी न्याय दिला, असे मी मानते. कारण एक सर्वसामान्य महिलेला त्यांनी उमेदवारी दिली. आता मला जनतेवर विश्वास आहे की, माझ्या पाठीमागे जनतेचा पाठिंबा आहे. त्यामुळे ही लढाई धनशक्तीविरोधात जनशक्तीची आहे. आणि, या लढाईत नक्कीच जनशक्तीचा विजय होणार आहे. या मतदारसंघात विकासाचा मोठा अनुशेष निर्माण झालेला आहे. मतदारसंघाचा कायापालट करण्यासाठी विधानसभेत जाणे गरजेचे आहे. आणि मतदारसंघातील मायबाप जनता मला नक्कीच विजयी करतील, असा विश्वासही डॉ. ऋतुजा चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केला.

एकवेळ तुमच्या बहिणीला म्हणजे डॉक्टर ऋतुजा चव्हाण यांना भरघोस मतांनी निवडून आणा, मग विकास काय असतो ते समजेल! पूर्वीपासून आमचे कुटुंब समाजसेवा करण्यात अग्रेसर असून, आमची तळागाळातील सर्वसामान्य माणसांसोबत नाळ जुळलेली आहे. डोणगांव शहरात आम्ही जवळपास २० अनाथ मुलांना दत्तक घेऊन पालकत्व स्वीकारलेले आहे. आमचा राजकारण हा पिंड नाही, कोणाला दोष देण्यासाठी राजकारणात आलो नाही, आमचा समाजसेवेचा पिंड आहे. त्यामुळे डॉ. ऋतुजा चव्हाण या महिला उमेदवारांना एकवेळ संधी द्या, या मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करुन दाखवू, अशी ग्वाही देतो.
– शेतकरी नेते ऋषांक चव्हाण
——
ही लढाई धनशक्तीविरोधात जनशक्तीची आहे. आणि, या लढाईत नव्ाäकीच जनशक्तीचा विजय होणार आहे. या मतदारसंघात विकासाचा मोठा अनुशेष निर्माण झालेला आहे. मतदारसंघाचा कायापालट करण्यासाठी विधानसभेत जाणे गरजेचे आहे. आणि मतदारसंघातील मायबाप जनता मला नक्कीच विजयी करतील.
– डॉ. ऋतुजा चव्हाण, उमेदवार, वंचित बहुजन आघाडी

यावेळी पत्रकारांच्या प्रश्नांना शेतकरी नेते ऋषांक चव्हाण यांनी उत्तरे दिली. ऋषांक चव्हाण म्हणाले की, आपसातील मतभेद विसरून आता कामाला लागायचे आहे, विजय आपलाच होणार आहे. डॉ. ऋतुजा चव्हाण एक महिला उमेदवार आहेत. त्या कोणत्याही उमेदवारांचे मतांचे विभाजन करण्यासाठी उभ्या नाहीत, तर त्या निवडून येण्यासाठी आणि श्रद्धेय अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकर यांचे हात बळकट करण्यासाठी आणि येथील जनतेचा विकास करण्यासाठी उभ्या आहेत. आज देशातील दिल्लीमध्ये पहा, तेथील जिल्हा परिषद शाळा कशा सुसज्ज इमारती आहेत. मग महाराष्ट्रामधील का नाही? याला जबाबदार कोण? असा प्रश्न यावेळी ऋषांक चव्हाण यांनी उपस्थित केला. आज बाहेरच्या राज्यात सोयाबीन पिकाला भाव आहे. मग महाराष्ट्रात सोयाबीन पिकाला भाव का नाही? दोन्ही ठिकाणी तर भाजप पक्षाची राजवट आहे, मग असा दुप्पटीपणा का? असा प्रश्न उपस्थित करून ऋषांक चव्हाण यांनी पत्रकार परिषदेमध्ये सत्ताधार्‍यांचा चांगलाच समाचार घेतला. आज मेहकर व लोणार तालुक्यात सुख-सुविधांचा अभाव आहे. गेल्या ३० वर्षांपासून या मतदारसंघाचा सर्वांगीण विकास झालेला नाही. एकवेळ तुमच्या बहिणीला म्हणजे डॉक्टर ऋतुजा चव्हाण यांना भरघोस मतांनी निवडून आणा, मग विकास काय असतो ते समजेल. पूर्वीपासून आमचे कुटुंब समाजसेवा करण्यात अग्रेसर असून, आमची तळागाळातील सर्वसामान्य माणसांसोबत नाळ जुळलेली आहे. डोणगांव शहरात आम्ही जवळपास २० अनाथ मुलांना दत्तक घेऊन पालकत्व स्वीकारलेले आहे. आमचा राजकारण हा पिंड नाही, कोणाला दोष देण्यासाठी राजकारणात आलो नाही, आमचा समाजसेवेचा पिंड आहे. त्यामुळे डॉ. ऋतुजा चव्हाण या महिला उमेदवारांना एकवेळ संधी द्या, या मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करुन दाखवू, अशी ग्वाही देतो, असे ऋषांक चव्हाण यांनी सांगत, सत्ताधार्‍यांचा खरपूस समाचार घेत, मतदारसंघातील जनताच परिवर्तन घडवून आणणार असा विश्वास व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!