वंचित बहुजन आघाडीची सातही मतदारसंघात तयारी!
- जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांच्या उद्या बुलढाण्यात मुलाखती!
बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – वंचित बहुजन आघाडीने आगामी विधानसभेसाठी जिल्ह्यातील सातही मतदारसंघात तयारी चालवली आहे. दरम्यान, जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांच्या उद्या, दि. ९ आक्टोबररोजी दुपारी १ वाजता येथील विश्रामगृह येथे मुलाखती घेण्यात येणार आहेत.
राज्यात वंचित बहुजन आघाडी विधानसभेच्या सर्व जागा लढणार असल्याची घोषणा पक्षाचे अध्यक्ष अॅड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी यापूर्वीच केली केली आहे. या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकत त्यांनी राज्यातील ११ उमेदवारांची घोषणादेखील यापूर्वीच केली आहे. यामध्ये जिल्ह्यातील सिंदखेडराजा विधानसभेसाठी सविताताई मुंढे ह्या एकमेव उमेदवार त्यांनी जाहीर केला आहे. दरम्यान, उर्वरित सहा मतदारसंघांसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती उद्या, दि. ९ ऑक्टोबररोजी येथील विश्रामगृह येथे दुपारी एक वाजता वंचित बहुजन आघाडीचे निवडणूक समन्वय समितीचे सहअध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर हे घेणार आहेत. यावेळी जिल्हा प्रभारी प्रदीप वानखडे हे उपस्थित राहणार आहेत. तरी इच्छुक उमेदवारांनी सदर मुलाखतीसाठी उपस्थित राहावे, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्षद्वय नीलेश जाधव व देवा हिवराळे यांनी केले आहे.