बोगस किटकनाशक व खते विकणाऱ्या पिं.गवळी येथील साईराम इरिगेशन दुकानातून 6 लाखाचा मुद्देमाल जप्त!
मोताळा(ब्रेकींग महाराष्ट्र) एकीकडे शेतकऱ्यांना वेळेवर खते, बि-बियाणे व किटकनाशक औषधे वेळेवर मिळत नाही. तर दुसरीकडे मोताळा तालुक्यातील पिंप्रीगवळी येथे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांचा वेष परिधान करुन 22 जुलै रोजी दुपारी 3.30 वाजता श्री साईरामा इरिगेशन व हार्डवेअर दुकानात क्लोरोपायरीफॉस 50% ईसी 1 लिटर किटक नाशक खरेदी केली. त्यावेळी विनापरवाना औषधी विकणाऱ्या दुकानाचा पर्दाफाश करीत सदर दुकानातून 5 लक्ष 83 हजार 527 रुपयांचा बेकायदेशीर नियमबाह्य बोगस किटकनाशक व खतांचा साठा जप्त करण्यात आला. दरम्यान दुकान मालक रोशन पाटील मात्र पळून जाण्यात यशस्वी झाला. बुलडाणा कृषी विभागाच्या या धडक कारवाईने मोताळा तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
मोताळा तालुक्यातील पिं.गवळी येथील श्री साईराम इरिगेशन व हार्डवेअर येथे विना परवाना किटक नाशक औषधीची विक्री होत असल्याची माहिती बुलडाणा कृषी विभागाला मिळाली होती. या माहितीवरुन जिल्हा कृषी अधिक्षक कार्यालयातील जिल्हा गुणवत्ता निरीक्षक अरुण इंगळे यांच्या मार्गदर्शनात बुलडाणा जि.प.कृषी विकास अधिकारी श्रीमती अनिसा महाबळे, मोहिम अधिकारी विजय लक्ष्मण खोंदील, मोताळा तालुका कृषी अधिकारी सचिन राजु मोरे यांच्या पथकाने 22 जुलै रेाजी दुपारी 3.30 वाजता पिं.गवळी येथे पोहचले. त्यावेळी विजय खोंदील यांना शेतकरी बनवून सदर साईरामा इरिगेशन व हार्डवेअर येथे पाठविण्यात आले. त्यावेळी तेथील कामगार श्रीकृष्ण खर्चे यांच्याकडे त्यांनी क्लोरोपायरीफॉस 50% EC 1 लिटर विकत घेण्यासाठी मागणी केली. त्यावेळी त्यांनी 1 क्लोरोपायरीफॉस 50% EC 1 लिटर या किटकनाशकाची एक लिटरची बाटली देवून 460 रुपयाचे साईराम हार्डवेअरचे पावती क्र. 71 चे बिल दिले. सदर दुकानात किटकनाशकाची बेकायदेशीर सर्रास विक्री होत असल्याचे खात्री पटल्यावर मोहिम अधिकारी खोंदील यांनी सदर माहीती गुणवत्ता नियंत्रक निरीक्षक अरुण इंगळे यांना फोनवरुन दिली. त्यावेळी कृषी विभागाचे सर्वजण साईराम इरिगेशन व हार्डवेअर या दुकानाचे मालक रोशन गजानन पाटील हे आले व त्यांनी मला आम्ही emamection benzoate 5% $C व ईतर किटकनाशके स्वस्त दरात विक्री करतो असे सांगितले. त्यावर त्यांना रासायनीक खत आणि किटकनाशके विक्रीचा परवाना मागितला असता ते दाखवू शकले नाही. परवाना नसतांना आपण विक्री कसे करता. याबाबत विचारणा केली व गोडावून कोठे आहे म्हटले असता त्याचा आमच्यावरील संशय बळावला व तो म्हणाला तुम्ही कोणत्या विभागाचे अधिकारी आहात? त्यावर आम्ही त्याला कृषी विभागाचे अधिकारी असल्याचे सांगितले. त्यावेळी आम्ही, त्यांचे दुकानाची पाहणी केली असता अवेधरित्या किटकनाशके साठवणुक केल्याचे निदर्शनास आले. कृषी विभागाने धा.बढे पोस्टे.वचे पोलिस अधिकारी मोहनसिंग सुरजसिंग राजपुत, व गजानन गंगाराम भराड यांना बोलविण्यात आले. दुपारी 4 वाजेच्या दरम्यान दुकानाची झडती घेवून दुकानातील विनापरवाना किटकनाशके, बुरशीनाशके, तणनाशक व रासायनीक खते यांचा पंचासमक्ष पंचनामा करुन बेकायदेशीरित्या साठवून ठेवलेला जवळपास 5 लक्ष 83 हजार 527 रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन धा.बढे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला. त्यातील प्रत्येक एक नमुना औरंगाबाद येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.
आरोपीवर चारशेवीसीचा गुन्हा दाखल..
शासनाची परवानगी न घेता हार्डवेअर दुकानामये बेकायदेशीर नियमबाह्य बोगस किटकनाशकांचा व खतांचे शेतकऱ्यांना विक्री केल्या प्रकरणी श्री साईराम इरिगेशन व हार्डवेअरचे मालक रोशन गजानन पाटील याच्यावर विनापरवाना खते व किटकनाशके विक्री करुन शासनाची दिशाभूल केल्याप्रकरणी कृषी विभागाचे जिल्हा निरीक्षक अरुण इंगळे यांच्या फिर्यादीवरुन धा.बढे पोस्टे.ला भादंवीचे कलम 420, सहकलम किटकनाशके अधिनियम 1968 कलम 3,13,27,9,18,29(1)(०),सहकलम किटकनाशके नियम 1971 चे कलम 9,10,15,16,17,18,19,20, सहकलम रासायनिक खते (नियंत्रण) आदेश 1985 चे कलम 7, 8,19,22 या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.