अहेरी (गडचिरोली)/सेवा वाकडोतपवार
राजे धर्मराव कला वाणिज्य महाविद्यालय आलापल्ली जिल्हा गडचिरोली येथे कार्यरत सुपरीचीत विद्यार्थीप्रीय प्राचार्य प्रो. डॉ. मारोती ऊध्दवराव टिपले यांना दिनांक ६ जून २०२२ रोजी मुंबई येथील दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्र येथे संपन्न झालेल्या शानदार सोहळ्यात त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रातील योगदानाची दखल घेऊन मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी संस्थेच्या वतीने त्यांची गुणीजण गौरव राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड केलीव तो मोठ्या शानदार सोहळ्यात मान्यवरांच्या हस्तेप्रदान करण्यात आला.
प्राचार्य डॉ. मारोती ऊध्दवराव टिपले ह्यांनी वनविभागात कार्यरत असतांना शासकिय वन कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित, आलापल्ली ची स्थापणा करून १० वर्ष सचिव म्हणून काम केले. यात अनेक गरजू सभासदांना कर्ज वाटप तर केलेच पण त्यांच्यात बचतीची प्रवृत्ती निर्माण केली. अनेक सामाजिक उपक्रमात सहभागी होवून लोक-कल्याणाचे कार्य केले. वनविभागातून सेवानिवृत्त झालेल्या ज्या वनमजूरांची पेन्शन सरकारने नाकारली होती त्या १२ ते १४ वनमजूरांना त्यांनी पेन्शन संघटना, आलापल्लीची स्थापना करून, त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांची प्रत्यक्ष ३ वेळा भेट घेऊन पेन्शन मिळवून दिली. तसेच शैक्षणिक क्षेत्रात प्राचार्य झाल्यापासून विद्यार्थी उन्नती साठीही सतत प्रयत्न सुरू केले आहेत. त्यांचे राज्यस्तरीय, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध शोधनिबंध प्रकाशित करण्यात आले आहे. त्यांनी सर्च गडचिरोली संस्थेच्या सहकार्याने व्यसनमुक्ती साठी अहेरी तालुक्यात कार्य केले आहे. त्यांच्या ह्या विविध प्रकारच्या कार्याचा गौरव म्हणून मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी संस्थेने त्यांना सन २०२० चा राज्यस्तरीय पुरस्कार पुणे येथे प्रदान करण्यात आला होता. तर मुंबई येथे झालेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात डॉ. मारोती ऊध्दवराव टिपले यांना राष्ट्रीय पुरस्कार २०२२ प्रदान करण्यात आला आहे.त्यात त्यांना सन्मानचिन्ह, गौरव पदक, महावस्त्र, मानकरी बॅच आणि मानाचा फेटा देवुन गौरव करण्यात आला आहे.
डॉ. मारोती ऊध्दवराव टिपले यांना मुंबई येथे राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल विद्यार्थी, पालक, महाविद्यालयाचे प्राध्यापक आणि कार्यालयीन कर्मचारी वृंद आणि धर्मराव शिक्षण मंडळ, अहेरी चे अध्यक्ष श्रीमंत राजे अम्ब्रीशराव महाराज, सचिव मा. एम.एल. मद्देर्लावार , प्राचार्य संजय कोडेलवार,मा. उरेते सर व प्राचार्य मंडल सर अहेरी यांनी अभिनंदन केले.