गुलाब वाघ/ गंगापूर
गंगापूर तालुक्यातील माळीवाडगाव येथे बजाज कंपनीच्या सी.एस.आर निधीतून जानकीदेवी बजाज संस्थेने वळई नदीच्या खोलीकरण व रुंदीकरण करण्याचे काम हाती घेतलेले असून, सदर काम ठेकेदार मार्फत चालू होते. हे काम चालू असताना माळीवाडगाव येथीलच श्रीमती नलिनी शामराव पाटील यांची गट नंबर 169 मध्ये वळई नदीला खेटून अकरा परस विहीर आहे. ज्यावेळी ठेकेदाराणे या ठिकाणी नदीचे खोलीकरण व रुंदीकरण चालू केले, त्यावेळी कोकलेनच्या साहाय्याने विहिरीच्या शेजारी पोयटा किंवा मुरूमचा भराव टाकणे गरजेचे असताना, वाळूचा भराव टाकल्याने विहिरीच्या सिमेंट कठड्याला दाब बसला व विहीरीचे कडे तुटून विहीरीत ढसळळे .त्यामुळे विहिरीत तीन परस वाळू, विटा, सिमेंटांचे कडे पडल्याने विहीर बुजली; मात्र रात्रीच सदर कोकलेन चालक कोकलेनसह पळून गेला. मात्र अद्यापही ढासळालेल्या विहिरीचा पंचनामा केला नसल्याने त्वरित पंचनामा करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली असून, नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.
वळई नदीला शेजारी माझी जमीन असून त्यात एक विहीरही आहे मात्र उन्हाळ्यात नदी खोलीकरणचे काम जानकीदेवी बजाज संस्थेने एका ठेकेदाराला दिले होते .त्या ठेकेदाराणे माझ्या विहिरीशेजारी खोलीकरणाच्या काम करतेवेळेस चालू केले. मात्र विहिरीशेजारी वाळूचा भरवा टाकल्याने विहिरीचे कडे व विटा ढासळाल्या व विहीर तीन परस बुजली म्हनून त्याचा पंचनामा करून नुकसानी भरपाई मिळावी .कारण ऐन पावसाळ्यात विहीर ढसळली असल्याने किमान दीड लाख रुपयाचे नुकसान झाले आहे.
- नलिनी शामराव पाटील (शेतकरी)