-ओबीसी जातनिहाय जनगणनेत स्वतंत्र कॉलमची मागणी; सामाजिक संघटन बळकट करण्यासाठी सामूहिक विवाह व मेळाव्यांवर भर
छत्रपती संभाजीनगर (अशोक इंगळे) : महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा ही समाजहितासाठी कार्य करणारी महत्त्वाची संघटना असून सामाजिक बांधिलकी जपत समाजातील विविध प्रश्न सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे अध्यक्ष तथा माजी खासदार रामदास तडस यांनी केले. छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत ते बोलत होते.
यावेळी महासभेचे सचिव डॉ. भूषण कर्डिले, प्रदेश उपाध्यक्ष गजानन शेलार, उपाध्यक्ष अशोक व्यवहारे, संजय विभुते, कोषाध्यक्ष बळवंत मोरधडे, सहसचिव सुनील चौधरी, जयेश बागडे, निलेश सोनूने, निलेश खैरनार, रंजन बिरारी, अरुण क्षिरसागर, सचिन शिंदे, पश्चिम विदर्भ सचिव रमेश आकोटकर तसेच बुलढाणा जिल्हाध्यक्ष सुभाष देव्हडे यांच्यासह राज्यभरातील पदाधिकारी उपस्थित होते. रामदास तडस म्हणाले की, महाराष्ट्रात विशेषतः विदर्भात तेली समाजाची संख्या मोठी आहे. समाजाच्या विविध समस्या सोडविण्यासाठी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी अधिक सक्रियपणे पुढे येण्याची गरज आहे. तेली समाज ओबीसी प्रवर्गात असून आगामी जातनिहाय जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र जातीचा कॉलम समाविष्ट करण्यात यावा, जेणेकरून समाजाची अचूक लोकसंख्या समोर येईल, अशी मागणी त्यांनी केली.
प्रांतिक तैलिक महासभेच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यात सामूहिक विवाह सोहळे, सामाजिक मेळावे आणि समाज प्रबोधनाचे विविध उपक्रम राबविण्यात यावेत. अशा उपक्रमांमुळे समाज अधिक संघटित होऊन विकासाच्या दिशेने वाटचाल करेल, असे आवाहनही त्यांनी केले. बैठकीच्या प्रारंभी दिवंगत सभासदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेण्यासाठी प्रस्ताव सादर करणे, आरक्षणाचा एकदा लाभ घेतल्यानंतर खुल्या प्रवर्गातून संधी उपलब्ध करून देण्याबाबत शासनाशी चर्चा करणे, तसेच मुंबई आणि नवी मुंबई येथील भूखंडासंदर्भातील प्रश्न शासनाकडे पाठपुरावा करून मार्गी लावणे आदी महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीस बुलढाणा जिल्हा कार्याध्यक्ष ज्ञानदेव क्षिरसागर, जिल्हा सचिव नंदकिशोर गायकवाड, सहसचिव विजय सोनूने, दत्तात्रय करवंदे, गोपाल पाखरे यांच्यासह महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या बैठकीस बुलढाणा जिल्हाध्यक्ष सुभाष देव्हडे, महिला जिल्हाध्यक्षा सुषमा राऊत, कार्याध्यक्ष ज्ञानदेव क्षिरसागर, जिल्हा सचिव नंदकिशोर गायकवाड, सहसचिव विजय सोनूने, दत्तात्रय करवंदे, गोपाल पाखरे यांच्यासह महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष सुभाष देव्हडे, महिला जिल्हाध्यक्षा सुषमा राऊत, कार्याध्यक्ष ज्ञानदेव क्षिरसागर, जिल्हा सचिव नंदकिशोर गायकवाड, सहसचिव विजय सोनूने, दत्तात्रय करवंदे, गोपाल पाखरे यांच्यासह महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील पदाधिकारी उपस्थित होते.