Chikhali

श्री गणेश मुर्ती प्राणप्रतिष्ठा आठव्या वर्धापनदिनानिमित्त प्रवचन व महाप्रसादाचे आयोजन

चिखली (महेंद्र हिवाळे) – येथून जवळच असलेल्या विदर्भ-मराठवाडा सरहद्द भोकर येथिल शिवगणेश संस्थान व गौरक्षण ट्रस्ट द्वारा स्थापित शिवगणेश गणपती मंदिरातील श्री गणेश मुर्ती प्राणप्रतिष्ठा आठव्या वर्धापनदिनानिमित्त मंगळवार, दि.७ मे २०२४ रोजी भव्य महोत्सव, प्रवचन व महाप्रसाद व विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आलेले आहे.

चिखली ते जाफ्राबाद रोडवर भोकरवाडीपासून १ कि.मी. अंतरावर बुलढाणा-जालना जिल्ह्याच्या सरहद्दीवर असलेल्या शिवगणेश गणपती मंदीर परिसरामध्ये मंगळवार दि.७ मे २०२४रोजी सकाळी १० वाजता प.पु.गुरुदेव १००८ वेदांताचार्य आचार्य स्वामी श्री हरिचैतन्यजी महाराज यांचे प्रवचन व त्यानंतर दुपारी ११ ते २ वाजेपर्यंत भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलेले आहे. तरी या कार्यक्रमाचा व महाप्रसादाचा पंचक्रोशीतील भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन शिवगणेश संस्थान व गौरक्षण ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष तथा युवासेनेचे बुलडाणा जिल्हा प्रमुख नंदु कर्‍हाडे व गणेशभक्तांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!