Breaking newsCrimeHead linesMaharashtraMetro CityMumbaiWorld update

सलमानच्या घरावर गोळीबार करणार्‍या आरोपीचा तुरूंगात आत्महत्येचा प्रयत्न

मुंबई (प्रतिनिधी) – हिंदी चित्रपटातील अभिनेता सलमान खान याच्या घरावर गोळीबार केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या एका आरोपीने तुरुंगात गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची गंभीर बाब उजेडात आली आहे. या आरोपीला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, तिथे त्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.

सलमान खानच्या वांद्रेस्थित घरावर गत १४ एप्रिल रोजी पहाटे ४.१५ च्या सुमारास दोन दुचाकीस्वारांनी गोळीबार केला होता. हल्लेखोरांनी एकूण ४ गोळ्या घराच्या दिशेने झाडल्या होत्या. त्यापैकी एक गोळी घरात शिरली, तर उर्वरित गोळ्या घराच्या भिंतीवर लागल्या. पोलिसांनी या घटनेच्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर आपला तपास सुरू केला होता. त्यानंतर लॉरेन्स बिश्नोई गँगने या हल्ल्याची जबाबदारी घेतली होती. मुंबई पोलिसांनी हा गोळीबार केल्याप्रकरणी अनुज थापन व सोनू चंदर या दोघांना अटक केली होती. यापैकी अनुज थापन याने बुधवारी तुरुंगात चादरीने गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही बाब तुरुंगातील कर्मचार्‍यांच्या लक्षात येताच, त्यांनी तातडीने त्याला लगतच्या रुग्णालयात हलवले. तिथे त्याची प्रवृäती गंभीर असल्याची माहिती आहे. अनुज थापन याच्यावर हल्लेखोरांना शस्त्र उपलब्ध करून देण्याचा आरोप आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने नुकत्याच्या त्याच्या पंजाब येथून मुसक्या आवळल्या होत्या. पोलिसांच्या माहितीनुसार, सागर पाल व विकी गुप्ता या दोघांनी हा हल्ला केला. यापैकी विकी गुप्ता हा दुचाकी चालवत होता, तर सागर पालने प्रत्यक्ष गोळीबार केला. हे दोघेही बिहारचे आहेत. हल्ल्यापूर्वी हे दोन्ही आरोपी पनवेल येथील एका घरात भाड्याने राहत होते. या घरमालकासोबत केलेल्या भाडेकरारनाम्याच्या आधारावर या दोघांनी एक दुचाकी खरेदी केली. हीच दुचाकी त्यांनी हल्ल्यासाठी वापरली. गोळीबार केल्यानंतर दोन्ही आरोपी गुजरातच्या भूज जिल्ह्याच्या दिशेने पळून गेले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!