– उन्हाचा तडाखा आणि रक्तातील साखर कमी झाल्याने आली होती भोवळ!
पुसद (जि.यवतमाळ) – केंद्रीय मंत्री तथा भाजपचे वरिष्ठ नेते नितीन गडकरी यांना आज पुसद येथील जाहीर सभेत भाषण करताना पुन्हा एकदा भोवळ आली. ते खाली कोसळत असतानाच कार्यकर्ते व त्यांच्या अंगरक्षकांनी सावरले, त्यांना तातडीने वैद्यकीय उपचार दिल्यानंतर ते थोडे सावरले, व थोड्यावेळाने पुन्हा स्टेजवर येऊन आपले भाषण पूर्ण केले. यापूर्वीही गडकरी यांना अशाप्रकारे जाहीर कार्यक्रमांत अनेकदा भोवळ आली होती. कडाक्याचे उन्ह, गर्मी आणि रक्तातील साखर कमी होणे, यामुळे ही भोवळ आली असावी, असा अंदाज डॉक्टरांनी वर्तविलेला आहे. पुसद येथील कार्यक्रम आटोपून ते अमरावती जिल्ह्यातील वरूड येथील जाहीर सभेला निघून गेले होते. यवतमाळ-वाशिम मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांच्या प्रचारार्थ ते पुसद येथे आले होते. पाटील या शिंदे गटाकडून उमेदवार आहेत.
https://twitter.com/i/status/1783103372708712635
हवामान खात्याने विदर्भात २७ ते २९ एप्रिलदरम्यान उष्णतेची लाट उसळणार असल्याचा इशारा दिला असला तरी, सद्याच विदर्भात सूर्य अक्षरशः आग ओकत असल्याचे दिसून येत आहे. या तळपत्या उन्हातही राजकीय सभांना जोर आलेला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची पुसद येथे शिंदे गटाच्या उमेदवार राजश्री पाटील यांच्या प्रचारार्थ सभा होती. या सभेला संबोधित करत असतानाच नितीन गडकरी यांना भोवळ आली. ते खाली कोसळत असतानाच त्यांना कार्यकर्ते व अंगरक्षकांनी सावरले. चेहर्यावर पाण्याचे शिंतोडे मारून लगेचच त्यांना अॅम्बुलन्समध्ये हलविण्यात आले. वैद्यकीय उपचारानंतर त्यांना थोडे बरे वाटले. ते पुन्हा स्टेजवर आले व आपले भाषण पूर्ण केले.
नितिन गडकरी आराम करके वापस आकर फिर से सभा को संबोधित किया! गडकरी जी अभी ठीक हैं और वो अगली सभा को संबोधित करने निकल चुके हैं!#NitinGadkari pic.twitter.com/C7aDDkKpxh
— जेठमजी (@Jethamji143) April 24, 2024
गडकरी यांना अशाप्रकारे भोवळ येण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी २०१८ मध्येदेखील राहुरी (जि.नगर) येथील कृषी विद्यापीठाच्या कार्यक्रमात नितीन गडकरी यांना अशीच भोवळ आली होती. त्यावेळी तत्कालीन राज्यपाल विद्यासागर राव यांनी त्यांना सावरत, रूग्णालयात हलविले होते. श्वास घेण्यास त्रास होणे, रक्तातील साखर कमी होणे, आदी त्रास झाल्यानंतर त्यांना अशा प्रकारे भोवळ येते. वाढलेले वजन, मधुमेह व रक्तदाबाचा त्रास, यामुळे ही समस्या निर्माण झाल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. सद्या विदर्भात सूर्य अक्षरशः आग ओकत असून, त्यात गडकरी यांच्या जाहीर सभा ठेवण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे संघ व भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते चिंताग्रस्त आहेत. गडकरी हे विदर्भातील सर्वाधिक लोकप्रिय असे नेते आहेत.
———-