Breaking newsBuldanaBULDHANAHead linesSINDKHEDRAJAVidharbha

समृद्धी महामार्गावर निवडणूक पथकाने पकडली २ लाखांची रोकड

सिंदखेडराजा (अनिल दराडे) – लोकसभा निवडणूक काळात आचारसंहितेच्या प्रभावी अंमलबजावणीसह कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, जिल्ह्यात प्रवेश करणार्‍या वाहनांची तपासणी करून त्यात काही गैरकायदेशीर बाबी आढळल्यास किंवा रक्कम आढळून आल्यास योग्य कारवाई करण्यासाठी स्थीर सर्वेक्षण पथकाची स्थापना करण्यात आली आहे. याच पथकाने समृद्धी महामार्गावरील दुसरबीड येथील टोल नाक्यावर तब्बल दोन लाखाची रोकड पकडून, संबंधितांची कसून चौकशी सुरू केली आहे.

निवडणूक काळात कुठलाही गैर कारभार होऊ नये, मतदारावर चुकीच्या पद्धतीने प्रभाव पाडण्याचा प्रयत्न होऊ नये, गैरकृत्यांना आळा बसावा तथा निवडणुका या निकोप, भयमुक्त, पारदर्शक वातावरणात पार पडाव्यात, यासाठी स्थीर सर्वेक्षण पथक कार्यरत करण्यात आलेले आहे. काल, दि. १७ एप्रिलरोजी सकाळी १०:३० वाजण्याच्या सुमारास दुसरबीड येथील समृद्धी महामार्ग छत्रपती संभाजीनगर एक्झिट पॉइंट येथे स्थीर सर्वेक्षण पथकाकडून एकूण दोन लाख रुपयांची रोकड पकडण्यात आली. मुंबईवरून येणारी इनोव्हा या गाडीमध्ये ही रोख रक्कम पथकप्रमुख योगेश कांबळे, सहायक राजेंद्र गहिरराव, पोलीस शिपाई श्री. मांटे, फोटोग्राफर श्री. सरडे यांच्या नेतृत्वाखाली पकडण्यात येऊन पुढील कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली एसएसटी पथकाचे नोडल अधिकारी डॉ. श्रीकृष्ण वेणीकर हे पुढील कारवाई करत असून, ही रोख रक्कम कुठून आली व कुठे नेली जात होती. तिची वैधता वैगरे बाबींची माहिती घेतली जात होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!