बिबी (ऋषी दंदाले) – शेतकरी नेते तथा लोकसभा निवडणुकीतील अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर यांची मुलुख मैदानी तोफ उद्या (दि.१९) बिबी येथे धडाडणार असून, त्यांच्या आयोजित जाहीर सभेला शेतकरी, ग्रामस्थ, युवक-युवती यांच्यासह सर्वांनी मोठ्या संख्येने हजर रहावे, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सहदेव लाड यांनी केलेले आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी नेते रविकांत तुपकर यांची शुक्रवारी (दि.१९) बिबी येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक या ठिकाणी संध्याकाळी सहा वाजता जाहीर प्रचारसभा होणार आहे. रविकांत तुपकर यांनी २ एप्रिलरोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्यांना जिल्हाभरातून जोरदार प्रतिसाद मिळत आहे. यावेळी कोणत्याही परिस्थितीत तुपकरांना खासदार करून दिल्लीत पाठवण्याचा निश्चय शेतकर्यांनी केलेला आहे. तरी तुपकरांच्या जाहीर सभेला परिसरातील शेतकर्यांनी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सहदेव लाड यांनी केले आहे.