बुलडाणा (ब्रेकिंग महाराष्ट्र) : जिल्ह्यात कोरोना पाय पसरत असून प्रशासनाने सतर्क राहून नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. तर आज 17 जुलै प्राप्त अहवालानुसार प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड चाचणीद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 853 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 813 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 40 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळा चाचणी मधील 17 व रॅपिड चाचणी मधील 23 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालांमध्ये प्रयोग शाळेतील 44 तर रॅपिड टेस्टमधील 769 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 813 अहवाल निगेटीव्ह आहेत.
पॉझिटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : दे. शहर : 4, दे. राजा तालुका : मेहुणा राजा 1, जवळखेड 1, कुंभारी 1, शिरला 2, निमखेड 2, पोखरी 1, उंबरखेड 1, सिनगाव जहा 1, किन्ही पवार 1, नांदुरा शहर : 1, नांदुरा तालुका : शेलगाव मुकुंद 1, बुलडाणा तालुका : धाड 1, सावळी 1, चिखली तालुका : बोरगांव 1, चिखली शहर : 1, सि. राजा तालुका : साखरखेर्डा 1, शेगाव शहर : 8, शेगाव तालुका : गव्हाण 1, गोळेगाव 1, तिंत्रव 1, जळगाव जामोद तालुका : सुलज 1, खामगाव तालुका : मोरगाव दिग्रस 1, गोंधनापुर 1, संग्रामपूर शहर :1, संग्रामपूर तालुका : पळशी झांशी 1, पर जिल्हा : डोंगरगाव ता. बाळापूर 1, नागपूर 1 अशाप्रकारे जिल्ह्यात 40 नवीन संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आली आहे. तसेच उपचार अंती 18 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
त्याचप्रमाणे आजपर्यंत 830391 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 98610 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 98610 आहे. आज रोजी 163 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 830391 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 99507 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 98610 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सद्यस्थितीत कोविडचा उपचार घेत असलेला 209 रूग्ण आहे. तसेच आजपर्यंत 688 कोरोना बाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.