बुलडाणा(ब्रेकींग महाराष्ट्र) वैद्यकीय प्रवेशांसाठी राष्ट्रीय स्तरावरून घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षेचे (नीट) प्रवेशपत्र विद्यार्थ्यांना 12 जुलै रोजी उपलब्ध करुन देण्यात आले आहे. नीट परीक्षा देशातील ४९७ शहरांमध्ये रविवार 17 जुलै रोजी दुपारी २ ते सायंकाळी ५.२० या वेळेत होणार आहे. ही परिक्षा बुलडाणा जिल्ह्यातील 15 परिक्षा केंद्रावर होणार असून 5925 विद्यार्थी परिक्षा देणार आहेत. प्रवेशपत्र दाखवल्याशिवाय विद्यार्थ्याला केंद्रावर प्रवेश दिला जाणार नाही, असे एनटीएकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
बारावीनंतर नीट परिक्षा देवून त्यामध्ये यश मिळवून विद्यार्थ्यांने एम.बी.बी.एस.डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण होवू शकते. वैद्यकीय संस्थांच्या युजी अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेण्यासाठी नीट युजी परिक्षा सर्वात आधी द्यावी लागते. यावर्षी नॅशनल टेस्टींग एजन्सीद्वारे घेतली जाणाऱ्या नीट परिक्षा होणार आहे. ही परीक्षा नीट (NEET) युजी म्हणून ओळखली जाते. नीट ही सर्वात कठीण वैद्यकीय प्रवेश परीक्षा आहे. राष्ट्रीय पात्रतासह प्रवेश परीक्षा राष्ट्रीय परीक्षा एजन्सी (एनटीए) द्वारे दरवर्षी पदवी (एमबीबीएस/ बीडीएस/आयुष अभ्यासक्रम) प्रवेशासाठी घेतली जाते.
बुलडाणा जिल्ह्यातील १५ परिक्षा केंद्रावर ही परिक्षा दुपारी २ ते सायंकाळी ५.२० या वेळेत होणार असून 5925 विद्यार्थी परिक्षा देणार आहेत. यामध्ये पोदार इंटरनॅशनल स्कूल बुलडाणा परिक्षा केंद्रावर २१६ विद्यार्थी परिक्षेस बसले आहेत, सहकार विद्या मंदीर बुलडाणा या परिक्षा केंद्रावर ७२० विद्यार्थी, श्रीमती सरोजबेन दामजीभाई विकमशी ज्ञानपीठ, खामगाव परिक्षा केंद्रावर ७२० विद्यार्थी, सेंट्रल पब्लिक स्कूल, मेहकर परिक्षा केंद्रावर ७२०, शारदा ज्ञानपीठ बुलडाणा ७२०, एडेड हायस्वूल अॅण्ड ज्युनिअर कॉलेज बुलडाणा येथे ३६०, सेंट जोसेफ इंग्रजी हायस्कूल, बुलडाणा येथे ३६०, स्कूल ऑफ स्कॉलर्स, मलकापूर परिक्षा केंद्रावर ३६०, पंकज लद्दड इन्स्टिट्यूट ऑफ तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन अभ्यास, येळगाव बुलडाणा येथे ३६०, भारत विद्यालय बुलडाणा २८८, तोमाई स्कूल जांभरुण, बुलडाणा या परिक्षा केंद्रावर १४४ विद्यार्थी, प्रबोधन विद्यालय, बुलडाणा परिक्षा केंद्रावर २४०, लोणार सेंट्रल पब्लीक स्कूल, लोणार २४०, शिवसाई युनिव्हर्सल ज्युनीअर कॉलेज, बुलडाणा येथे २४० तर एम.एस.एम. इग्लीश स्कूल अॅण्ड ज्युनियर कॉलेज, मलकापूर या परिक्षा केंद्रावर २३७ विद्यार्थी परिक्षा देणार आहे, असे एकूण ५९२५ विद्यार्थी डॉक्टर होण्याचे स्वप्न उराशी बाळगून ते परिक्षा देणार आहेत.