चिखली (महेंद्र हिवाळे) – तालुक्यातील अंत्री कोळी येथे काल (दि.२१) अयोध्येतील प्रभू श्रीराममूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त गावात दीपोत्सव व श्रीराम दिंडी काढण्यात आली. यानिमित्त बालगोपाळांचा उत्साह अवर्णनीय असा होता. गावातून भव्य रथयात्रा निघाल्याने संपूर्ण गाव भक्तीमय झाले होते.
मौजे अंत्री कोळी येथे काल मोठ्या थाटामाटात अयोध्येतील प्राणप्रतिष्ठेचा उत्सव जल्लोषात साजरा करण्यात आला. येथे प्रभू श्रीरामांची रथातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. गावामध्ये राम, सीता, लक्ष्मण, हनुमान यांच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली. या वेळी संपूर्ण गावांमधून भव्य रथयात्रा काढण्यात आली. या या भव्य रथ यात्रेमध्ये लहानापासून तर आबालवृद्धांपर्यंत सर्वजण भक्तिमय वातावरणामध्ये रमून गेले होते. या सोहळ्यानिमित्त अंत्री कोळीमध्ये घरोघरी रांगोळी काढून दीपोत्सव साजरा करण्यात आला. रथाला फुलांनी सजवून त्यामध्ये प्रभू श्रीराम, लक्ष्मण, सीतामाता व रामभक्त हनुमंताच्या वेशभूषेत लहान मुलांची टाळ मृदंगाच्या गजरात गावातून दिंडी काढण्यात आली. त्यानंतर गावातील हनुमंताच्या मंदिरात प्रसाद वाटप करून प्रभूश्रीरामाची सामूहिक आरती घेऊन दिंडीची सांगता करण्यात आली.