BuldanaCrimeHead linesSINDKHEDRAJAVidharbha

प्रेम आंधळं नाही, बिनडोक!; अल्पवयीन मुलीला घेऊन २२ वर्षीय युवकाची एकत्र गळफास घेत आत्महत्या!

सिंदखेडराजा (तालुका प्रतिनिधी) – इयत्ता आठवीत शिकणार्‍या अवघ्या १३ वर्षाच्या मुलीने तिच्यापेक्षा जवळ दुप्पट वयाच्या मुलासोबत घरू पळून जात काही दिवस बेपत्ता राहिल्यानंतर अचानक साखरखेर्डा शिवारातील एका झाडाला मुलासह गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. प्रेमवैगरेदेखील न समजण्याच्या कोवळ्या वयात या मुलीने स्वतः आत्महत्या केली की, तिला भावनाविवश करत त्या २२ वर्षीय मुलानेच आपल्यासोबत गळफासात ओढले, याबाबत परिसरात चर्चा सुरू आहे. ‘प्रेम आंधळे असते म्हटले जात होते, परंतु ते बिनडोक आणि मूर्खदेखील असते’, या घटनेने उघडकीस आले असून, पालकांनी आपल्या मुलींवर लक्ष ठेवण्याची गरज आहे.  दरम्यान, आता अल्पवयीन मुलीसोबत आत्महत्या केलेल्या तरुणाच्या वडिलांनीदेखील गळफास घेतला आहे. त्यामुळे बापलेकावर एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्याची दुर्दैवी वेळ शेंदुर्जनवासीयांवर आली होती.

आत्महत्या करणार्‍या मुलाचे नाव गोपाल समाधान खिल्लारे (वय २२) असे असून, मुलगी अवघी १३ वर्षाची असल्याने तिचे नाव कायदेशीररित्या प्रकाशित करता येत नाही. या घटनेचे व्हिडिओज व फोटोजही ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ला कायदेशीर अडचणीमुळे प्रकाशित करता येणार नाहीत. मुलीच्या आईने दिनांक १८ डिसेंबररोजी मुलगी गायब असल्याची तक्रार साखरखेर्डा पोलिसांत दिली होती. मुलगा व मुलगी हे शेंदूरजन (ता. सिंदखेडराजा) येथील रहिवासी आहेत. गेले चार दिवस हा २२ वर्षीय युवक अल्पवयीन मुलीला घेऊन पळून गेला होता. या मुलीचे कोवळे वय पाहाता, तिला फारसी समज नसावी, त्यामुळे या मुलानेच या मुलीला फूस लावल्याचे दिसून येत आहे. गेले चार दिवस हा मुलगा मुलीला घेऊन कुठे तरी निघून गेला होता, परंतु आज सायंकाळी या दोघांचा एकत्र गळफास घेतलेला मृतदेह सूतगिरणी परिसरातील एका झाडाला लटकलेला आढळला. या घटनेची माहिती साखरखेर्डा पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. पोलिसांनी दोन्ही मृतदेह शवविच्छेनदासाठी पाठवण्यात आले आहे. पालकांनी आपल्या अल्पवयीन मुलीवर लक्ष ठेवण्याची गरज आहे. या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे.


दरम्यान काल सायंकाळी या दोन्ही अल्पवयीन प्रेमी युगुलांचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत सापडला होता. पोलिसांनी पंचनामा करून दोघांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवले होते. आज दोघांवर अंत्यसंस्कार करण्यात येणार होते. मुलांनी टोकाचं पाऊल उचलल्याने दोघांच्याही पालकांवर दु:खाचा डोंगर कोसळला. मुलांच्या मनासारखं झालं असतं तर ते आज जिवंत असते, असा विचार करत दोन्ही कुटुंबातील माता-पितांनी टाहो फोडला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!