Breaking newsBuldanaVidharbha

वीज दरवाढीविरोधात आम आदमी पार्टीचे बुलडाण्यात आंदोलन करून सरकारचा निषेध

बुलढाणा ( ब्रेकिंग महाराष्ट्र) : महावितरण कडून लॉकडाऊन काळात दि.१ एप्रिल २०२० पासून २०% वीज दर वाढ करण्यात होती. संपूर्ण देशात महागडी वीज राज्यात आहे. तरीही नव्या सरकारने आल्याबरोबर २०% पर्यंत या महिण्यापासून भाव वाढ केली आहे. याचा आम आदमी पार्टीकडून निषेध करून येथिल जयस्तंभ चौकात घोषणाबाजी करीत सरकारचा निषेध नोंदविला. शिवसेनेकडून विधानसभा निवडणुकी पूर्वी राज्यातील जनतेला वचन दिले होते की आमचे सरकार आल्यास आम्ही ३०० युनिट घरगुती वापरात ३०% स्वस्त वीज देवू. तसेच बीजेपी कडून विविध राज्यातील निवडणूक जाहीरनाम्यात १०० ते २०० युनिट वीज मोफत देण्याचे जाहीर केले आहे. एवढेच नव्हेतर महाआघाडी सरकार असतांना मागच्या दोन वर्षात बीजेपी व स्वता .देवेंद्र फडणवीस यांनी वीज दर वाढ कमी करने व मोफत वीज देण्याबाबत अनेक वेळा रस्त्यावर येवून आंदोलन केलेत. मात्र सरकार येताच नव्या सरकारने वीज दरवाढ केली आहे. दिल्ली मध्ये अरविंद केजरीवाल सरकार मागच्या आठ वर्षांपासून २०० युनिट वीज मोफत आणि जास्ती वापर करणाऱ्यांनाही कमीत कमी दरात वीजपुरवठा करीत आहे. तरीही दिल्ली सरकार चे वीज खाते नफ्यात आहे. तसेच नव्याने सरकार मध्ये आलेले पंजाब मधील भगवंत मान सरकार ने सुद्धा दि. १ जुलै पासून ३०० युनिट मोफत वीज केली आहे. राज्यात २.५० ते ३.०० रुपयात प्रती युनिट तयार होणारी वीज १२ ते १८ रुपये प्रति युनिट प्रमाणे दर लावून जनतेची लुट होत आहे. ही सावकारी लुट थांबविण्यासाठी आम आदमी पार्टी हा मुद्दा घेवून राज्यात गेल्या दोन वर्षापासून सातत्याने आंदोलन करीत आहे. राज्यात दि १ जुलै २०२२ पासून विजेच्या दरात जी १० ते २० % अधिभार लावून वाढ केली ती त्वरित मागे घ्यावी. आपण खरे शिवसैनिक असल्यामुळे ३०% स्वस्त वीज देण्याच्या वचननाम्याची पूर्तता करण्यात यावी. महावितरण वीज कंपणीचे CAG मार्फत ऑडीट करण्यात यावे, राज्यातील जनतेला दिल्ली व पंजाब सरकार प्रमाणे कमीत कमी २०० युनिट वीज मोफत द्यावी. आदी मागण्या करण्यात आल्या. या आंदोलनात गणेश इंगळे, सुभाष गवई, प्रसाद घेवंदे, इरफान शेख, सलीम पठाण, अजय बोर्डे, सुनिल मोरे, अविनाश खंडाळे,भगवान अवसरमोल, ॲड.दिपक मापारी, ॲड.अमित दाभाडे, अमोलकुमार गवई, अशाफक शेख, सईद शाह, तन्वीर शेख, राजेंद्र अग्रवाल, दिलीप इंगळे आदी पदधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.(श.प्र)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!