Breaking newsHead linesKhamgaon

भरधाव दुचाकीवरील नियंत्रण सुटले; खामगावचा तरूण ठार!

मेहकर / बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – भरधाव असलेली दुचाकी तरूणाकडून अचानक अनियंत्रित झाल्याने रोड़खाली जावून खड्ड्यात कोसळली. या अपघातात खामगावच्या मोहंमद तलहा नावेद देशमुख (वय २५), व्यवसाय मे़डिकल स्टोअर्स याचा मृत्यू झाला. ‘ये सपना है या हकिकत’ असे म्हणत सदर तरूणाने प्राण सोडल्याचे घटनास्थळी धावलेल्या प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. ही दुर्देवी घटना १ ऑक्टोबररोजी दुपारी १२ वाजेदरम्यान खामगाव ते मेहकर रोड़वर देऊळगाव साकरशाजवळील पाथर्ड़ी गावाजवळील वळणावर घड़ली.

खामगाव येथील प्रसिद्ध ड़ॉ. नावेद देशमुख यांचा मुलगा मोहंमद तलाह देशमुख हा मेहकरकड़ून दुचाकी (क्रमांक एमएच २८ बीआर ६४९८) येत असताना पाथर्ड़ी गावाजवळील वळणावर सदर भरधाव दुचाकी अनियंत्रीत झाल्याने रोड़खाली जावून खड्ड्यात कोसळली. यामध्ये सदर तरूणाचा जागीच मृत्यू झाला. ‘ये सपना है या हकिकत’ असे म्हणत सदर तरूणाने प्राण सोड़ला. आपला अपघात कसा झाला हेही या भरधाव वेगातील तरूणाच्या लक्षात आले नाही, असे त्याच्या बोलण्यावरून दिसून आले. मृतक तरूण मोहंमद तलाह नावेद देशमुख हा पाथर्ड़ी येथील रोशनशाबाबा यांच्या दर्ग्यावर नियमित दर्शनासाठी येत असे, असे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. सदर अपघातातील दुचाकी रेसर कावासाकी असून, तिची किंमत बारा लाखाचे आसपास असल्याचे समजते.
————

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!