Breaking newsBULDHANAVidharbha

विदर्भातील शेतकर्‍यांना अब्जावधींचा फटका; दाणे न भरताच सोयाबीन पिवळे पड़ून वाळले!

बुलढाणा (बाळू वानखेडे) – सर्वाधिक सोयाबीन पिकाचे उत्पादन घेणार्‍या विदर्भातील शेतकर्‍यांवर आभाळ कोसळले आहे. बुलढाणा जिल्ह्यासह विदर्भातील सर्वच जिल्ह्यांतील सोयाबीन पीक दाणे न भरताच पिक पिवळे पड़त असून, उभे वाळत चालले आहे. यामुळे उत्पादनात मोठी घट येणार असल्याने शेतकर्‍यांना अब्जावधी रूपयांचा फटका बसणार आहे. बुलढाणा जिल्ह्यात हे चित्र अत्यंत भीषण असून, मेहकर, चिखली, सिंदखेडराजा, देऊळगावराजा या तालुक्यांत यांचा प्रादुर्भाव जास्त असल्याचे दिसून आले आहे. देऊळगाव साकरशा शिवारातील अशा सोयाबीन पिकाची नुकतीच कृषी विभागाच्या कर्मचार्‍यांनी शेतात जाऊन पाहणी केली.

गेल्या वर्षी सततच्या पावसाने खरिपाचे हातचे पीक गेले. यासाठी शासनाने एकरी बाराशे रूपयेची तुटपुंजी मदत दिली. तीही बरेच शेतकर्‍यांना अद्याप मिळाली नाही. तर उन्हाळ्यात धो धो पाऊस पड़ला, त्यामुळे रब्बी व उन्हाळी हातचे पीक गेले. तीही मदत सर्व शेतकर्‍यांपर्यंत अद्याप पोहोचणे बाकी आहे. असे असताना शेतकर्‍यांची सर्व आर्थिक मदार चालू खरीप पिकांवर होती. पहिलेच पाऊस कमी, त्यातच विविध रोगांनी उचल खाल्याने बुलढाणा जिल्ह्यासह विदर्भातील अनेक भागातील सोयाबीन दाणे न भरताच उभी वाळत आहे. यामुळे उत्पादनात मोठी घट येणार असल्याने शेतकर्‍यांची चिंता वाढली आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील चिखली, मेहकर, सिंदखेडराजा, बुलढाणा, लोणार, देऊळगावराजा या तालुक्यांत अशा नुकनासीचे प्रमाण सर्वात जास्त आहे. मेहकर तालुक्यातील वरवंड़ महसूल मंड़ळात देऊळगाव साकरशा शिवारातील सौ.विद्याताई वानखडे, जगराम पवार, परशराम चव्हाण, श्रीराम पवार आदि शेतकर्‍यांच्या पिवळ्या पड़लेल्या सोयाबीन पिकाची नुकतीच कृषी पर्यवेक्षक ड़ी. जी. वायाळ, कृषी सहाय्यक पी. एस. अंभोरे यांनी पाहणी केली. नुकसान जास्त असून, तसा अहवाल वरिष्ठांना देणार असल्याचे कृषी पर्यवेक्षक वायाळ यांनी सांगितले. असेच नुकसान नायगाव देशमुख, पारखेड़, मांड़वा सह इतर शिवारात असल्याचे सांगितले जात आहे. याबाबत शासनाने सर्वेक्षण करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.


चारकोल किंवा कॉलर रॉटचा प्रादुर्भाव!

जिथे पाऊस जास्त तिथे कॉलर रॉट तर पाऊस कमी असेल आणि पिकाला ताण पड़ला असेल तेथे चारकोल रॉट व मूळ खोड़ कूज दिसून येते. अशा परिस्थितीत जमिनीचे तापमान वाढते व पाऊस पड़ला की कमी होते. त्यामुळे बुरशीची वाढ होऊन खोड़ व मुळावर अटॅक करते, यामुळे झाड़ सुरूवातीला सुकते व दाणे भरण्याच्या अवस्थेत अन्नद्रव्ये न मिळाल्याने पिवळे पड़ून मर लागल्यासारखे होते, असे कृषी शास्त्रज्ञ ड़ॉ. अनंत इंगळे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!