Breaking newsBULDHANAHead linesLONAR

अंजनी गावाजवळ भरधाव ट्रॅव्हल बस उलटली; ७ ते ८ प्रवासी गंभीर जखमी, तिघांची प्रकृती चिंताजनक!

लोणार (विजय गोलेछा) – जुन्या मुंबई-पुणे-नागपूर महामार्गावर सुलतानपूरजवळ असलेल्या अंजनी गावाजवळ आज (दि.८) सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास खासगी ट्रॅव्हल बसला भीषण अपघात झाला. या बसच्या चालकाला डुलकी लागल्याने त्याचे बसवरील नियंत्रण सुटले आणि त्यातून ही बस झाडाला धडकून पलटली. या अपघातामध्ये सात ते आठ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. त्यातील तीन प्रवाशांची प्रकृती चिंताजनक असून, त्यांना छत्रपती संभाजीनगर येथे हलविण्यात आले होते. इतरांवर मेहकर येथील ग्रामीण रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

पुण्यावरून साधारण ३५ प्रवासी घेऊन ही ट्रॅव्हल बस अमरावतीकडे जात होती. अंजनी गावाजवळ समोरून ट्रक आडवा आल्याने या खाजगी ट्रॅव्हल्सचा अपघात झाला असल्याचे सांगितले जाते. तर चालकाला डुलकी लागल्याने हा अपघात झाल्याची माहिती हाती आली आहे. सकाळी साडेसहा वाजता हा अपघात झाला. यावेळी गावकर्‍यांनी तात्काळ मदतकार्य करत अपघातग्रस्त ट्रॅव्हल्समधून जखमींना बाहेर काढले आणि तात्काळ त्यांना स्थानिक रुग्णालयात उपचारार्थ पाठवण्यात आले. सातत्याने होत असलेल्या खाजगी ट्रॅव्हल्सच्या अपघाताचा मुद्दा या अपघाताने पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, प्रवाशांचे जीव धोक्यात घालून खाजगी ट्रॅव्हल्स बेभानपणे रस्त्यावर वाहताना पाहायला मिळत आहेत. त्यावर कुठलेच निर्बंध वाहतूक पोलिसांकडून लावले जात नसल्याचेही दुर्देवी चित्र आहे.


प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, साई अमृत ट्रॅव्हल्सची असलेली ही बस पुण्याहून नागपूरला जात होती. सकाळी साडेसहा वाजता अपघात झाला. बसमध्ये ३५ प्रवासी होते. चालकाला अचानक डुलकी लागल्याने अनियंत्रित होऊन बस सुरुवातीला झाडाला धडकली आणि नंतर पलटी झाली. अपघातात बसचालक गंभीर जखमी झाला असून, त्याची प्रकृती चिंताजनक आहे. पोलीस आणि स्थानिकांनी जखमी प्रवाशांना मदत केली. जखमींवर मेहकर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर काही गंभीर रुग्णांना पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगरमधील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
————-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!