– मुंबईतील आझाद मैदानावर धडकला मोर्चा!
बुलढाणा (संजय निकाळजे): भूमिमुक्ति मोर्चा व बहुजन मुक्तिमोर्चा, दलित कोब्रा संघटनेच्यावतीने भरपावसात आजाद मैदानवर भाई प्रदीप अंभोरें संस्थापक अध्यक्ष यांच्या नेतृत्वात अतिक्रमण धारकांच्या विविध मागण्यांसंदर्भात मोर्चा काढण्यात आला. यावेळी महसूलमंत्री रामकृष्ण विखे पाटील यांनी गायरान, वनजमिनी, शेतीपिके व निवासी घरांची अतिक्रमणे काढणार नसल्याचे आश्वासन यावेळी दिले.
याप्रसंगी डॉ.राजू वाघमारे संयुक्त संघटन कार्याध्यक्ष तथा प्रदेश प्रवक्ता कांग्रेस भाई विवेक चव्हाण, संस्थापक भारतीय दलित कोब्रा, कामगार नेते सागर तायड़े, मार्गदर्शनात भाई भीमराव खरात प्रदेशाध्यक्ष, बाबूराव सरदार, राज्यप्रवक्ते दिनकर घेवंदे, प्रदेश उपाध्यक्ष अंबादास वानखेडे, अमरावती विभाग रमेश गाडेकर विदर्भ प्र, भगवान गवई मराठवाड़ा प्रमुख, आदींच्या प्रमुख उपस्थितित आजाद मैदान मुंबई भूमि हक्क संघर्ष सत्याग्रह मोर्चा काढन्यात आला. आंदोलनादरम्यान महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस अध्यक्ष आ. नाना पटोले यानी राज्यतिल भूमिहिनाच्याप्रश्नी मी विधानसभेत आवाज उठवेल व पक्ष पातळीवर मलिकार्जुन खारगे राष्ट्रीय अध्यक्ष यांच्याकड़े तथा हा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात पक्षाकडून बाजू मांडण्यासाठी संपूर्ण ताकत कांग्रेस पक्ष भूमिहीनना देईल, असा विश्वास भाई प्रदीप अंभोरे याना दिला. राज्यतील भूमिहिनांची येत्या काही दिवसात राज्यव्यापी परिषद घेऊन हा लढ़ा भूमिमुक्ति मोर्चा व अन्य संघटनासह तीव्र करू व उच्च न्यायालय मुंबई न्यायालयीन लढा कायदेशीर उभा करण्यात पुढ़ाकार घेईल, असे अभिवचन संघटनेचे कार्याध्यक्ष व मार्गदर्शक डॉ.राजू वाघमारे भारतीय राष्ट्रीय कांग्रेस प्रदेश प्रवक्ता यांनी दिला. राज्यातील हजारो हेक्टर गायरान व वन जमिनीवर लाखो लोकांनी अतिक्रमण करून शेती कसून आपल्या कुटुंबाची उपजीविका व गायरान जमीन भूखंडावर अतिक्रमण करून निवास करत आहे. ही अतिक्रमण काढण्याचे न्यायालयाने आदेश पारित केले असले तरी जमिनीवर लाखो गरीब बहुजन भूमिहीनांनी पेरणी केली असल्याने त्यांच्या शेतीवरील उभ्या पिकांचे अतिक्रमण निष्कासन तूर्त करणार नाही. उच्च न्यायालयात गायरान जमिनी व भूखंड वरील कृषि व निवासी अतिक्रमण कायदेशीर करण्यासाठी शासनातर्पेâ बाजू मांडण्यात येणार आहे. तोपर्यंत गायरान जमिनीवरील पेरणी केलेली उभी पिके व कुणालाही बेघर केले जाणार नाही, असे आश्वासन राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिष्टमंडळास दिले.
भूमीमुक्ती मोर्चा व संयुक्त संघटन विद्यमाने मुख्यमंत्री यांना दिलेल्या निवेदनामध्ये, राज्यभरातील बहुजन भूमिहिनांची १०० टक्के कर्जमुक्ती घोषणा, जिगांव पेनटाकळी, खडकपूर्णा प्रकल्पबाधित पट्टेधारक पर्यायी जमीन, वनजमीन अपात्र दावेदाराचे पुनर्विचार दावे दाखल करून वनविभाग अवाजवी हस्तक्षेप थांबवा, शासकीय सर्व घरकुल अनुदान निधी १.२० लक्ष वरुन २.५ लक्ष करण्यात यावा, बुलढाणा जिल्ह्याचे नामांतर ‘राजमाता जिजाऊ नगर’ जिल्हा घोषणा करा, नवीन जिल्हा निर्मितीत बुलढाणा जिल्हा विभाजनात ‘उदयनगर’ स्वतंत्र तालुका घोषणा करावी, आधी मागण्यांबाबत मुख्यमंत्री व संबंधित मंत्री यांच्याकड़े चर्चा करून शासनस्तरावर बैठक बोलावून मागण्यांची कायदेशीर पूर्तता करू, शासनाने मागणीबाबत चालू अधिवेशनात घोषणा न केल्यास १५ ऑगस्ट स्वतंत्रतादिनी शासनाविरूद्ध राज्यव्यापी सत्याग्रह आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा भाई प्रदीप अंभोरें यानी संयुक्त संघटनेच्यावतीने निवेदनाद्वारे राज्य शासनास महसूल मंत्री यांच्यामार्फथ दिला आहे. आंदोलन यशस्वीतेसाठी राजकुमार जाधव, अशोक इंगले जळगांव, ब्रह्मानंद नवघरे वाशिम, अनिसभाई पठाण, लुकमान भाई, भाई प्रवीण राजगुरु, गजानन जाधव बुलढाणा, भास्कर मिसाळ नाशिक, देवीदास साळवे औरंगाबाद, इलियास भाई पठाण बुलढाणा, राहुल साळवे हिंगोली, किशोर वाघमारे वकिल भाई, नागोराव पैठणे, रंजीत बर्डे भरत मुंडे, सुनील दांडगे, रामेश्वर चव्हाण, तुर्म पवार, गतरंग पवार, बृजलाल चौहान, शालिनीताई बन्सोड, रेखाताई जाधव, सुमनबाई पवार, परूबाई जाधव, अतिक्रमण धारकांसह मुंबईमध्ये दिवसभर पाऊस पडत असताना मोठ्या संख्येने दलित, आदिवासी महिला व पुरुष मोर्चात सहभागी झाले होते.