सोलापूर (जिल्हा प्रतिनिधी) – अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सुदीप चाकोते यांच्या प्रयत्नातून केरळात बसवेश्वर महाराज जयंती शासकीय पद्धतीने साजरा करण्यास मुख्यमंत्र्यांचे आदेश दिले आहे. यामुळे चाकोते यांच्या प्रयत्नाला यश आल्याने त्यांचा लिंगायत समाजामधून गौरव होत आहे.
अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासभा युवक यांच्यावतीने अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासभा चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ शिवशंकर आमदार ईश्वर खंडारे, माजी आमदार विश्वनाथ चाकोते यांच्या मार्गदर्शनाखाली ऑक्टोबर २०२२ महिन्यात केरळचे मुख्यमंत्री पिनरई विजयान यांची गाठ घेतली. त्यानंतर केरळमध्ये असलेल्या ४० लाख वीरशैव लिंगायत लोकांचे भावना व त्यांचा मान सन्मान होण्यासाठी येणार्या अक्षय तृतीयेला केरळमध्ये सर्व शासकीय कार्यालयामध्ये व राज्यात बसवेश्वर महाराजांची जयंती शासकीय पद्धतीने साजरा करण्यात यावे म्हणून निवेदन दिले होते.
तसेच मुख्यमंत्र्यांनी यावर्षी जी आर काढून राज्यात सगळीकडे बसवेश्वर जयंती शासकीय पद्धतीने साजरा करण्यात यावी, म्हणून आदेश दिले. केरळची राजधानी त्रिवेंद्रम मध्ये महात्मा बसवेश्वर महाराजांच्या पुतळा बसविण्यात यावे, वीरशैव लिंगायत भवन साठी दोन एकर जागेची मागणी, आर्थिक दृष्टीने मागास असलेल्या सर्व वीरशैव लिंगायत लोकांसाठी वीरशैव लिंगायत महामंडळाची स्थापना करण्यात यावे असे अनेक मागणी निवेदन द्वारे करण्यात आले होते. यावेळी सुदीप चाकोते, गोपण गवडा, सिद्धू चौका, एल. व्ही. प्रसाद यांच्यासह अनेक बसव भक्त उपस्थित होते.