लोणार (प्रतिनिधी) – सध्या उन्हाळ्याचे दिवस असून, अनेक गावांमध्ये पाणीटंचाई भासत आहे. असेच लोणार तालुक्यातील चोरपांग्रा वीरपांग्रा येथे नागरिकांना पाण्याची टंचाई भासू नये, यासाठी शहीद जवान नितीन राठोड यांचे बंधू जनसेवक प्रवीण राठोड यांनी गावातील पिण्याचे पाण्याची टाकी साफ करून ३० हजार रुपये किमतीची नवीन मोटर बसवून पाणी व्यवस्था सुरळीत केली व नागरिकांची पाण्याची समस्या दूर केली.
यावेळी ग्रामपंचायत सरपंच सावित्रीबाई राठोड, उपसरपंच प्रफुल इंगळे, मिलिंद चव्हाण, माजी ग्रामपंचायत सदस्य रामराव चव्हाण, संजय चव्हाण, संजय इंगळे यांच्यासह ग्रामस्थांनी जनसेवक प्रवीण राठोड यांचे आभार व्यक्त केले. गावात पाण्याची समस्या निर्माण झाली होती. पाण्याची टाकी साफ करणे व नवीन मोटारही गरजेची होती. त्यासाठी प्रवीण राठोड यांनी पुढाकार घेऊन पाण्याची समस्या दूर केल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.
————–