Head linesPachhim MaharashtraSOLAPUR

छत्रपतींचा जयघोष, स्वानंदच्या शिवगीतांनी जिल्हा परिषद दणाणली

सोलापूर (जिल्हा प्रतिनिधी) – सर्वत्र भगवे फेटे, शाहिरांचा मर्दानी पोवाडा, अंगावर शहारे आणणारे शिवरायांच्या गीतांनी यशवंतराव चव्हाण सभागृह दणाणून गेले. छत्रपतींच्या जयघोषाने जिल्हा परिषद दणाणली. मराठा सेवा संघ जिल्हा परिषद शाखा सोलापूर यांच्यातर्पेâ यशवंतराव चव्हाण सभागृह येथे शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी जिल्ह्यात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या विविध विभागातील कर्मचार्‍यांना कार्यकुशल पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

जिल्हा परिषदेच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज उद्यानातील छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळ्यास मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांचेहस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचे प्रतिमेचे पूजन मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांनी केले. जिल्हा परिषदेच्या मराठा सेवा संघ शाखा व माध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद सोलापूर यांचे संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर हे होते. मराठा सेवा संघ शाखेच्यावतीने कार्यकुशल पुरस्कार वितरण सोहळा झाला.

यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी जावेद शेख, प्राथमिक शिक्षणाधिकारी संजय जावीर, माध्यमिक शिक्षणाधिकारी सुलभा वठारे, कार्यकारी अभियंता पंडित भोसले, कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी, कार्यकारी अभियंता खराडे, कार्यकारी अभियंता सुनील कटकधोंड, कास्ट्राईब कर्मचारी संघटनेचे अरूण क्षीरसागर, अधीक्षक अनिल जगताप, लिपिक वर्गीय संघटनेचे संघटक राजेश देशपांडे, जिप. कर्मचारी संघटनेचे विवेक लिंगराज, गिरीष जाधव, अधीक्षक चंद्रकांत होळकर, अधीक्षक सचिन सोनकांबळे, अध्यक्ष संतोष जाधव, आप्पाराव गायकवाड प्रमुख उपस्थित होते. यावेळी स्वानंद, वडवळच्या जिप शिक्षकांचा वाद्यवृंद असलेला ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ हा शिवगीतांचा बहारदार कार्यक्रम झाला. गर्जा जय जय महाराष्ट्र माझा या राज्यगीताने कार्यक्रमास प्रारंभ झाला. यामध्ये शिवचरित्रावर आधारित विविध गिते, पोवाडा यांच्या सादरीकरणाने शिवभक्तांची मने जिंकली. सूत्रसंचालन महेश कोटीवाले यांनी केले. आभार जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव यांनी मानले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सचिन चव्हाण, राम जगदाळे, अनिल जगताप, सचिन जाधव, सचिन साळुंखे, प्रकाश शेंडगे, सुभाष कदम, आप्पासाहेब भोसले, विठ्ठल मलपे, संतोष शिंदे, संजय पाटील, अजित देशमुख, महेश पाटील, विशाल घोगरे, चेतन भोसले, प्रदिप सुपेकर, विकास भांगे यांनी परिश्रम घेतले.


यांचा झाला सन्मान
मुख्य लेखा व वित्त अधिकारी अजयसिंह पवार, गट विकास अधिकारी मनोज राऊत (करमाळा), वैद्यकीय अधिकारी डॉ. सागर मंगेडकर, शाखा अभियंता राजेश जगताप, ग्रामविकास अधिकारी पांडुरंग कागदे, ग्रामसेवक नागनाथ जोडमोटे, प्राथमिक शिक्षक अर्जुन आवताडे, वरिष्ठ सहाय्यक प्रदीप सकट, वरिष्ठ सहाय्यक (लेखा) विलास मसलकर, परिचर विरभद्र हिरजे यावेळी जेष्ठ पत्रकारांचा गौरव करण्यात आला.
——————

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!