विद्यार्थ्यांनी मेहनतीबरोबर सातत्य ठेवावे – आ. सौ. श्वेताताई महाले पाटील
चिखली (तालुका प्रतिनिधी) – कोणतेही काम असू द्या, त्या कामाचे व वेळेचे नियोजन, आणि कामाच्या टाईम टेबलनुसार काम करणे ही त्या कामाची योग्य पध्दत आहे. कोणत्याही कामासाठी जेव्हढे कठोर परिश्रम, मेहनत घ्याल तितके यश उत्तुंग असते आणि जो कष्ट घेईल तो यशस्वी होईल. परंतु त्यासाठीसुद्धा मेहनत आणि कष्टाला सातत्याची जोड असल्याशिवाय चांगले यश मिळत नाही. ज्यांच्या कष्टाला आणि मेहनतीला सातत्याची जोड आहे त्याला उत्तुंग यशापासून कोणीही रोखू शकत नसल्याचे प्रतिपादन आमदार सौ. श्वेताताई महाले यांनी परीक्षा पे चर्चा या कार्यक्रम झाल्यावर एक्झाम वॉरियर चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण करताना केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून ‘परीक्षा पे चर्चा ‘ हा कार्यक्रम सर्व शाळांमधून राबविण्यात आला. चिखली विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक शाळेतसुद्धा हा कार्यक्रम राबविण्यात आला. आदर्श विद्यालय येथे आयोजित या कार्यक्रमात आ. सौ. श्वेताताई महाले पाटील स्वतः सहभागी झाल्या होत्या. यावेळी एक्झाम वॉरियर चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांना सर्वोत्कृष्ट चित्र काढणार्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. ‘परिक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमातील एक भाग म्हणून चिखली विधानसभा मतदारसंघात दि २१/१/२०२३ रोजी एक्झाम वॉरियर चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत मतदार संघातील २४ शाळांनी सहभाग घेऊन जवळपास सहा हजार आठशे विद्यार्थ्यांनी या चित्रकला स्पर्धेत आपल्या कलेचे प्रदर्शन केले होते. त्यातील प्रत्येक शाळेतून सर्वोत्कृष्ट तीन चित्रांना अनुक्रमे ३१००, २१०० व ११०० रुपयांचे बक्षीस देण्यात आले. सोबत प्रत्येक सहभागी विद्यार्थी विद्यार्थिनींना सहभाग प्रमाणपत्रसुद्धा देण्यात आले.
आदर्श विद्यालयात ‘परीक्षा पे चर्चा’चे थेट प्रक्षेपण
आजची पिढी डिजिटल गुलाम झालेली आहे प्रत्येकाच्या हातात मोबाईल इंटरनेट कम्प्युटर या माध्यमातून आपण एकमेकांशी जोडलेले जरी असलो तरी मनाने आणि शरीराने एकमेकांपासून खूप दूर जात आहोत. डिजिटल गुलामगिरीतून बाहेर पडण्यासाठी किमान एक दिवसाचा डिजिटल फास्ट म्हणजेच डिजिटल उपवास करण्याचा मुलाचा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परिक्षा पे चर्चा या कार्यक्रमात दिला असल्याने त्यांनी दिलेल्या सल्ल्याने प्रत्येकाने अनुकरण करण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन आ.सौ. श्वेताताई महाले पाटील यांनी यावेळी केले.
भारताची भावी पिढी आव्हानांना तोंड देण्यासाठी सक्षम व्हावी म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमातून देशभरातील विद्यार्थी, शिक्षक व पालकांशी मनमोकळा संवाद साधला. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण पाहण्याची व्यवस्था चिखली येथील आदर्श विद्यालयात करून विद्यार्थ्यांसह आ. सौ. श्वेताताई महाले पाटील आणि भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी यांनी मार्गदर्शनाचा लाभ घेतला.
देशाच्या विविध गावांमधून विद्यार्थ्यांनी पंतप्रधानांना प्रश्न विचारले आणि मोदीजींनीही तितक्याच उत्साहात रोजच्या जगण्यातील सोपी उदाहरणे देऊन संकल्पना स्पष्ट केल्या. हार्ड वर्क करावे की स्मार्ट वर्क करावे? या प्रश्नाला उत्तर देताना ‘स्मार्ट पद्धतीने हार्ड वर्क करावे’ असे उत्तर त्यांनी दिले. तसेच कॉपी करणारा विद्यार्थी एखाद्या परीक्षेत गुण मिळवेलही पण आयुष्याच्या परीक्षेत तो मागे पडेल. त्यामुळे यशाला शॉर्टकट शोधू नका, असाही सल्ला मोदीजींनी दिला. वेळेचे व्यवस्थापन कसे करावे, आपल्यावरील टीकेला कसे तोंड द्यावे, चांगले गुण मिळावे म्हणून कुटुंबातील दबाव कसा हाताळावा यावर अतिशय सखोल मार्गदर्शन मा. पंतप्रधानांनी या वेळी केले. हे मार्गदर्शन केवळ विद्यार्थ्यांनीच नाही तर ज्याला आयुष्यात यश मिळवायचे आहे त्या प्रत्येक व्यक्तीने पुन्हा पुन्हा ऐकावे असे आहे.
शिवाजी विद्यालय व आदर्श कॉन्व्हेन्ट व इतर ठिकाणीसुद्धा झाले बक्षीस वितरण
परिक्षा पे चर्चा या कार्यक्रमातील एक भाग म्हणून आ. सौ. श्वेताताई महाले यांच्या संकल्पनेतून चिखली विधानसभा मतदारसंघात दि. २१ जानेवारी रोजी एक्झाम वॉरियर चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत मतदार संघातील २४ शाळांनी सहभाग घेऊन जवळपास सहा हजार आठशे विद्यार्थ्यांनी या चित्रकला स्पर्धेत आपल्या कलेचे प्रदर्शन केले होते. त्यापैकी शिवाजी विद्यालय व आदर्श कॉन्व्हेन्ट तसेच मासरुळ येथील शिवाजी विद्यालय डोमरुल शरद पवार विद्यालय , म्हसला जि प शाळा आणि चांडोळ येथील शिवाजी आणि उर्दू शाळेतील विजेत्यांना सुद्धा स्थानिक भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी यांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले.
आदर्श विद्यालयात झालेल्या या कार्यक्रमात अॅड. विजय कोठारी प्रदेश कार्यकारिणी सदस्य भाजप, रामकृष्ण दादा शेटे अध्यक्ष शिक्षण प्रसारक मंडळ, प्रेमराज भाला सचिव शिक्षण प्रसारक मंडळ, सुहास शेटे माजी नगराध्यक्ष, डॉ. कृष्णकुमार सपकाळ तालुका अध्यक्ष भाजप, शेख अनिसभाई जिल्हा अध्यक्ष भाजप अल्पसंख्याक आघाडी, गोविंद देव्हडे, प्रा. वीरेंद्र वानखेडे जिल्हा कार्यकारिणी सदस्य भाजप, पंजाबराव धनवे जिल्हा सरचिटणीस युवा मोर्चा, सागर पुरोहित शहराध्यक्ष युवा मोर्चा, संतोष काळे तालुका अध्यक्ष भाजप युवा मोर्चा, विकास जाधव तालुका अध्यक्ष भाजप शिक्षण आघाडी, सुनील पोफळे जिल्हा कार्यकारिणी सदस्य भाजप, विजय खरे जिल्हा मीडिया प्रमुख, मनीष गोधने, शंकर सुरडकर, सुधाकर सुरडकर, पंजाबराव धनवे जिल्हा सरचिटणीस युवा मोर्चा, सागर पवार, अक्षय भालेराव, छोटू कांबळे, विजय वाळेकर, शाम वाकदकर, सुरेश यंगड, संजय पाटील, सूरज थोरवे, प्राचार्य समाधान शेळके यांच्यासह शिक्षक, शिक्षिका विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
——————