आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : राज्यातील महत्त्वपूर्ण तीर्थक्षेत्र असलेल्या आळंदीत धर्म रक्षणाचे कार्यासाठी आयोजित हिंदू जनगर्जना मोर्चास परिसरातील भाविक, नागरिकांसह वारकरी संप्रदायातील मान्यवरांनी उत्साही प्रतिसाद देत मोर्चाचे यशस्वी केला. यावेळी हजारो हिंदुजन एकवटले. घोषणा परिसर व रस्ते भगवेमय झाले होते.
आळंदीत हिंदू लोकांचे धर्मांतर ख्रिश्चन धर्मात होत असल्याचे निदर्शनात आल्यानंतर धर्मांतरणाची बाब उघड झाली. आळंदीतील तसेच राज्यातील धर्मांतर रोखण्याच्या विषयाकडे लक्ष वेधण्यासह हिंदू धर्मांतर रोखण्यास देशात तसेच महाराष्ट्रात धर्मांतर बंदी कायदा लागू करण्याचे मागणीसाठी या मोर्चार्चे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चास वारकरी शिक्षण संस्थेपासून सुरुवात होऊन मोर्चाचे प्रदक्षिणा मार्गे माउली मंदिरासमोरील महाद्वारात सांगता झाली.
याप्रसंगी राज्यभरातील तसेच आळंदी पंचक्रोशीतील साधक, वारकरी संप्रदायातील मान्यवर तसेच आळंदीतील भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते युवक तरुण, महिला आणि विविध पक्षीय पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या मोर्चात जय श्रीराम, संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज की जय, सनातन हिंदु धर्म कि जय, भारतमाता की जय, हार हार महादेव अशा घोषणा देत तीर्थक्षेत्र आळंदीचे पावित्र्य राखले पाहिजे, धर्मांतर विरोधी कायदा झाला पाहिजे अशा घोषणा देत मोर्चात देण्यात आल्या. यावेळी अलंकापुरीत हिंदू जनगर्जना मोर्च्याला उत्साही प्रतिसाद मिळाला. हिंदू धर्मांतरण विरोधी कायद्याची प्रमुख मागणीस पाठिंबा देत मार्गदर्शन झाले. पुणे जिल्ह्यातील वारकरी संप्रदायासह साधक, कीर्तनकार, प्रवचनकार यांचे सह हिंदू भूषण शाम महाराज राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी सुनील शास्त्री यांचे प्रमुख मार्गदर्शन झाले.विविध घोषणा देत जनजागृती करण्यात आली. यासाठी गणेश गरुड,किरण येळवंडे ,निलेश गायकवाड, किरण मुंगसे, समस्थ आळंदी ग्रामस्थ, वारकरी संप्रदाय यांनी विशेष परिश्रम घेतले. मार्गदर्शना नंतर पसायदानाने सांगता झाली. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालया अंतर्गत विशेष पोलीस बंदोबस्त आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील गोडसे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश पाटील यांचे मार्गदर्शनात तैनात करण्यात आला होता. वरिष्ठ वाहतूक पोलीस निरीक्षक शहाजी पवार यांनी विशेष सहकार्य केले.