BULDHANAVidharbha

नवरात्रीत जगदंंबाराऊळी १५१३दीप अखंड तेजोमय!

राजेंद्र काळे

बुलढाणा : नवरात्र अन् घटासमोरील अखंड दीप प्रज्वलन, ही प्रकाशमय भारतीय संस्कृतीची तेजोमय परंपरा. पावसाळी वातावरणातील घरात वा राऊळात असणारा सुक्ष्म जीवाणुंचा संसर्ग तेलप्रज्वलानातून निघून जावा, ही त्यातील आयुर्वेदिक आरोग्यमय धारणा. घटस्थापना होणाऱ्या घरातून अखंड नंदादीप निरामयपणे तेवत असतो. परंतु आजकाल नोकरी निमित्ताने अनेक महिलांचे घराबाहेर राहण्याचे प्रमाण जास्त वाढले आहे, तर काही जणींना सुतूक, विधी वा मासिक पाळी अशा प्रकारने अखंड नंदादीप तेवत ठेवणे शक्य होत नाही. अशा कुटुंबासाठी ७ वर्षापूर्वी श्री जगदंबा देवी संस्थान सव येथे अखंड नंदादीप लावण्याचा संकल्प अध्यक्ष तुकाराम शेळके यांच्या संकल्पनेतून साकारल्या गेला. पहिल्यावर्षी १००, दुसऱ्यावर्षी ३००, तिसऱ्यावर्षी ५५० तर यावर्षी म्हणजे सातव्या वर्षी तब्बल १५१३ नंदादीप निरामय प्रकाशात नवरात्रीत जगदंबेच्या राऊळी दिसत आहे झालेले, अखंड तेजोमय !

पैनगंगा नदीच्या निसर्गरम्य खळखळत्या तिरावर येळगाव जलाशयातून पाझरणारा पाण्याचा प्रवाह, त्या वाहत्या पाण्यात स्नान करण्यासाठी नवरात्रीच्या पहाटे परिसरातील भाविकांची जमणारी गर्दी, मधूर आवाजातील मंत्र.. या मोहक वातावरणात सव परिसरातील जगदंबा मंदिरात नवरात्रीचा उत्सव हा उत्साहात बहरतो. ९ दिवस सकाळ व संध्याकाळ परिसरातील गणमान्य जोडप्यांच्या हस्ते मातेची महाआरती होते. या देवीला अन् मंदीराला पुरातन अख्यायिका आहे. परंपरेला नव्याची जोड, या विचारातून संस्थानच्या विश्वस्त मंडळाने अखंड नंदादीप तेवत ठेवण्याचा उपक्रम २०१५ सालापासून हाती घेतला आहे.

‘असतो या सदूगसय, तमसो मॉ ज्योतीर्गमय.. मृत्योमाँ अमृत गमय, ओम शांती शांती शांती:’ या महामंत्राद्वारे अंधःकारमय जीवनात प्रकाश निर्माण करण्यासाठी नंदादीप लावण्याचा उपाय सांगितला आहे.. याच भावनेतून यावर्षी २६ सप्टेबर ते ४ ऑक्टोबरपर्यंत अखंड नंदादीप भाविकांच्या सेवेत समर्पीत करण्यात आले आहे. दीप, वात, तेल व दीप देखभालसाठी केवळ ५०० रुपये खर्च संस्थानच्या कार्यालयात पावतीसह घेतल्या गेला. विशेष म्हणजे दीप क्रमांकाची नावासह नोंद केली जात असल्याने, कोणत्या क्रमांकाचा दीप कोणाचा? हे त्या दिव्याजवळ नाव चिटकविलेले असल्यामुळे लक्षातही येते.. या माध्यमातून एक प्रकाशमय पारदर्शकताच संस्थानने राखली आहे. नवरात्रीच्या या भावमय अशा भक्तीमय पर्वात, म्हणूनच जगदंबाराऊळी सव येथे प्रकाशाची उधळण करीत आहे…
१५१३ दीप अखंड तेजोमयपणे!

अष्टमीची पुजा पत्रकार राजेंद्र काळे यांच्या हस्ते..
नवरात्रीत दुर्गाष्टमीचे अनन्यसाधारण भक्तीमय महत्व असते, या आठव्या माळेला सकाळची महाआरती गत सात वर्षापासून दै.देशोन्नतीचे जिल्हा प्रतिनिधी राजेंद्र काळे व सौ.गायत्री काळे या दाम्पत्याच्या हस्ते होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!