चालक तथा वाहक सरळ सेवा भरती 2019 वरील स्थगिती उठवा अन्यथा आझाद मैदानावर मरेपर्यंत अन्नत्याग आंदोलन
बुलढाणा(ब्रेकिंग महाराष्ट्र)-: चालक तथा वाहक सरळ सेवा भरती २०१९ वरील स्थगिती उठवून, कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणारी ५ हजार पदांच्या प्रक्रियेचा निर्णय तात्काळ मागे घेण्यात यावा अन्यथा 10 ऑक्टोबर पासून मुंबई येथील आझाद मैदानावर अन्नत्याग आंदोलनाचा इशारा शेखर चेन्ने उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, मध्यवर्ती कार्यालय मुंबई यांना विभाग नियंत्रक, रा.प. महामंडळ विभाग बुलढाणा यांच्या मार्फत दिलेल्या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री व परिवहन मंत्री यांना सुद्धा पाठविण्यात आल्या आहे.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ,कार्यालयाने 2019 मधे, विभाग बुलढाणा करिता सरळ सेवा भरती अंतर्गत 472 चालक तथा वाहक पदाची जाहिरात प्रसिद्ध केली होती आणि त्या संदर्भात प्राप्त उमेदवाराकडून ऑनलाइन अर्ज मागवून कार्यपद्धतीने सर्व निवडीचे निकष लावून बुलढाणा विभागाची चालक तथा वाहक अंतिम निवड यादी लावून 138 उमेदवाराचे सेवा पूर्व प्रशिक्षण ही पूर्ण करून घेतलेले आहे. परंतु राज्यामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने ही भरती प्रक्रिया थांबवण्यात आली होती. त्यानंतर राज्यामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी झाल्यावर 05 जुलै 2021 ला आम्ही विभाग नियंत्रण कार्यालय यांच्यामार्फत आपणास विनंती केली होती की, ज्या उमेदवाराचे सेवा पूर्व प्रशिक्षण पूर्ण झाले आहे, अशा उमेदवाराची अंतिम वाहन चाचणी (MEO test) पूर्ण करून घ्यावी आणि त्यांना नियुक्ती द्याव्या, परंतु यावर काहीच उत्तर मिळाले नाही त्यानंतर रा.म.प कर्मचाऱ्यांचा काही मागण्यासाठी संप सुरू झाला आणि हा संप मागे घेण्यास कर्मचारी तयार नसताना विभाग नियंत्रक यांना विनंती केली की आमची राहिलेले प्रक्रिया पूर्ण करून (MEO test)आम्हाला महामंडळाच्या हलाखीच्या काळात सेवेची संधी द्यावी परंतु आपण तसे न करता आम्हाला डावलून बाह्य यंत्रणेद्वारे कंत्राट पद्धतीने चालक नेमले. सद्यस्थितीला उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर रा.प.म.चे सर्व कर्मचारी कर्तव्यावर आले असल्याने सर्व वाहतूक सुरळीत झाली आहे. त्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात नेमलेले कंत्राटी कर्मचारी बंद करण्यास संदेश आपण प्रसारित केला. असून त्यावर अंमलबजावणी झाली आहे परंतु महामंडळाने 2019 साली सरळ सेवा भरती करून पात्र उमेदवारांची निवड करून ठेवली आहे आणि यातील 138 उमेदवाराची सेवा पूर्व प्रशिक्षण पूर्ण करून घेतले आहे. आणि 263 अजूनही आपल्या प्रशिक्षण सुरू होण्यासंदर्भात वाट पाहत आहे परंतु आपण यांचा विचार न करता पुन्हा महामंडळामध्ये 5 हजार कंत्राटी चालक नेमण्यासंदर्भात मनुष्यबळ पुरवठा कंपन्याकडून ई टेंडर मागितलेले आहे. यामुळे आमची मागणी आहे की 5हजार कंत्राटी चालक नेमण्याचा निर्णय मागे त्वरित घ्या आणि त्या संदर्भात आपल्या कार्यालयातून संदेश प्रसारित करा, तसे आम्हाला ही कळवा आणि सरळ सेवा भरती 2019 वरील स्थगिती मागे घ्या, अन्यथा असे न झाल्यास बुलढाणा विभागातील 401 पात्र उमेदवार तसेच इतर सर्व विभागातील सरळ सेवा भरतीतील नियुक्ती वाचून बाकी राहिलेले निवड झालेले उमेदवार 10 ऑक्टोबर 2022 पासून आझाद मैदान मुंबई येथे मरेपर्यंत अन्नत्याग आंदोलन करणार असल्याचा इशारा या निवेदनात देण्यात आला आहे.
या निवेदनावर अर्जुन खंडागळे, मधुकर शिंगारे, योगेश भोकरे, वैभव मेहरे, प्रमोद गवई, नंदकिशोर नेमाडे, भरत सूर्यवंशी, उमेश शेलकर, प्रमोद डीवरे, मंगेश धुरदेव, वाल्मीक राऊत, विठ्ठल तायडे, सय्यद मुजम्मिल सय्यद हारून, कृष्णा भारंबे, सुनील बोरकर , लक्ष्मण ढोले, सुरज लष्कर, सुरेश आवटे, समाधान राठोड, शिवाजी जाधव, स्वप्निल शेळके, गणेश सपकाळ, अरुण शेळके, महेंद्र गवई, पंकज इंगळे, सुरज गोपनारायण, विठ्ठल अंभोरे, गजानन पुरी, सिद्धार्थ सावळे, राजू पंडित, गजानन उबाळे, भगवान कांबळे, सिद्धार्थ काकडे, प्रवीण गावंडे, सचिन बुंदेले, यांच्यासह पात्र उमेदवारांच्या सह्या आहेत.